

Novelist Manoj Borgavkar Highlights Importance of Lifelong Reading
Sakal
पारनेर : वन्यप्राणी केवळ निसर्ग वाचत असतात, पण माणसाने त्याही पुढे जाऊन पुस्तक, निसर्ग आणि माणूस यांना वाचण्याचे काम आयुष्यभर केले पाहिजे. पुस्तकांच्या वाचनाने माणूस नम्र होतो आणि समृद्ध होतो," असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संमेलनाध्यक्ष मनोज बोरगावकर यांनी केले. पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात 'पत्रकार दिना'चे औचित्य साधून पारनेर तालुका पत्रकार संघ आणि महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात ते बोलत होते.