esakal | स्वयंरोजगारातून महिलांना आत्मनिर्भर करणार -राणी लंके
sakal

बोलून बातमी शोधा

parner.

लंके म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे. विशेषतः शहरी भागातील महिला या पुढे आहेत. आता ग्रामीण भागातील महिलांनीही स्पर्धेच्या युगात मागे राहता कामा नये.

स्वयंरोजगारातून महिलांना आत्मनिर्भर करणार -राणी लंके

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (नगर) : स्वयंरोजगारातून महिला सक्षम झाल्या पाहिजेत. त्यांना इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी महिलांना स्वयंरोजगार निर्माण करून त्यांना आत्मनिर्भर करण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांनी केले. शहरातील जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सहसंघटक रोहिणी वाघमारे यांनी सुरू केलेल्या उद्योगाचे लंके यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

लंके म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे. विशेषतः शहरी भागातील महिला या पुढे आहेत. आता ग्रामीण भागातील महिलांनीही स्पर्धेच्या युगात मागे राहता कामा नये. आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगाराचा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानची महिला सक्षमीकरणासाठी विशेष मदत मिळणार आहे. त्यात प्रत्येक महिलेने सहभाग नोंदवा, असे आवाहनही यावेळी लंके यांनी केले. वाघमारे यांनी स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात पाऊल टाकून महिलांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

यावेळी नगराध्यक्ष वर्षा नगरे, नगरसेवक सुरेखा भालेकर, मयुरी औटी, कविता औटी, संगिता गाडेकर, शुभांगी पठारे, पल्लवी बांदल, योगीता गट, ॠतुजा गाडेकर, निकिता मेहेर, गौरी वाघमारे आदी महिला उपस्थित होत्या. 

संपादन - सुस्मिता वडतिले