Ahilyanagar: पहिल्याच दिवशी शाळा बंद, ७ वर्गांना फक्त ३ शिक्षक; पालक संतप्त
Teacher Shortage Sparks Protest: जिल्हा परिषद शाळा, शिक्षकांची कमतरता, मनेगाव शाळा या मुद्द्यांवर पालक आक्रमक. सात वर्गांसाठी केवळ तीन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप.
पोहेगाव: कोपरगाव तालुक्यातील मनेगाव येथे सात वर्गासाठी केवळ तीन शिक्षक उपलब्ध असल्याने संतप्त पालकांनी शाळाच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद शाळेचे वर्ग रिकामे राहिले.