श्रीरामपूर : राज्यभर वाढत्या उन्हाचा विचार करता जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांचे वेळापत्रक सकाळ सत्रात बदलण्यात आले. मात्र, अहिल्यानगर जिल्हा या बदलाला अपवाद होता.‘सकाळ’च्या पाठपुराव्यानंतर अखेर जिल्हा परिषदेने तातडीने निर्णय घेत गुरुवारपासून प्राथमिक शाळांचे वेळापत्रक सकाळी ७ ते दुपारी १२.३० असे निश्चित केले आहे.