दंतवैधक व रुग्णांमध्ये सेतू बनणार ‘ॲप’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

कोरोना विषाणू प्रादूर्भावामुळे गेली तीन महिन्यांपासून दंतरुग्णांना उपाचर घेण्यात अडचणी येत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी दंतवैद्यकीय क्षेत्रात रुग्ण व दंतवैधक यांच्यात सेतूचे काम करणारे ॲप विकसित करण्यात आले आहे.

अकोला : कोरोना विषाणू प्रादूर्भावामुळे गेली तीन महिन्यांपासून दंतरुग्णांना उपाचर घेण्यात अडचणी येत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी दंतवैद्यकीय क्षेत्रात रुग्ण व दंतवैधक यांच्यात सेतूचे काम करणारे ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲप केवळ रुग्णांना दंतवैधकाकडे उपचारासाठी नोंदणी करणेच शक्य होणार नाही तर रुग्णांना दवाखाण्यात येण्याची वेळही हा ॲप सूचविणार आहे.

 

राज्यभरातील डेंटल क्लिनिक कोरोना विषाणूमुळे बंद आहेत. त्याचा दंतवैद्यकीय क्षेत्राला चांगलाच फटका बसलेला आहे. रुग्णांना दातातील कळा सहन करीत दिवस काढावे लागत आहे. डॉक्टरही थेट रुग्णांच्या श्‍वासाशी संबंध येत अलल्याने धास्तावले आहेत. रुग्णांचे उपचार होत नसल्याने त्यांच्या किडलेल्या दातातून इन्फेक्शन परसण्याची भिती आहे तर डॉक्टरांना कोरोना विषाणू संसर्गाची भिती वाटत आहे. समज-गैरसमजातून गेली तीन महिने बहुतांश दातांचे दवाखाने बंद आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी डॉक्टर व रुग्णांमधील एखादा सेतू निर्माण करण्याच्या उद्देशाने फमीडेन्ट इंडिया या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपचा मुख्य उद्देश अलगिकरण व विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे हा आहे.

 

कसे काम करणार ॲप?
डेंटिस्ट त्यांच्या रुग्णांच्या सोयीकरिता क्लिनिकची नोंदणी या ॲपमध्ये करणार. दंतदुखीने त्रस्त रुग्ण त्याच्या घराजवळ कुठले डेन्टल क्लिनिक कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षित राहील याची माहिती घेईल. त्यानुसार घरूनच तो ऑनलाइन अपॉइन्टमेंट घेवू शकेल. नोंदणी करणाऱ्या रुग्णाला या ॲपच्या माध्यमातूनच त्यांची डॉक्टरांकडे तपासणी व उपचार घेण्यासाठीची वेळ दिली जाईन आणि त्या वेळेत रुग्णालयात पोहोचण्यासाठी ॲप सूचितही करेल. डॉक्टर एक रुग्ण तपासत असताना किंवा उपाचर करीत असाताना त्यावरील उपाचार संपण्याचा अवधी गृहित धरून ॲप पुढल्या रुग्णाला अलार्मद्वारे सूचित करेल. रुग्णाला हा अलार्म संदेश मिळाला की रुग्णाने घरून क्लिनिकला जाण्यासाठी निघावे. त्यामुळे क्लिनिक मधली गर्दी टाळता येईल आणि उपचारा अभावी कळ काढत रुग्णांनाही घरी बसावे लागणार नाही.

इन्फेक्शनवरही ठेवणार लक्ष
डॉक्टर व दंड रुग्णांच्या सोयीनुसार असलेल्या फ्युमिडेन्ट व्हेरिफाईड डेन्टल क्लिनक ॲपमधून रुग्णांच्या दातात होणाऱ्या इन्फेक्शनवरही विशेष लक्ष देणे शक्य होणार आहे. जेणे करून कुठलाही वायरस, बॅक्टेरियाला पसरण्यापासून रोखता येईल, असा दावाही तज्ज्ञांनी केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: App to bridge bridges between dentists and patients Akola marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: