अकोला नागपूरच्याही पुढे, आज किती वाढले आणि किती दगावले हे ‘रुटीन’ होतंय, हवा ॲक्शन प्लॉन

विवेक मेतकर
Thursday, 28 May 2020

शहराच्या मध्यभागी असलेल्या बैदपुरा येथे ७ एप्रिल रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्याला ५० दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला. त्यानंतरही कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सारखी वाढतच आहे. काल एकाच दिवसात ७२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.  दरम्यान महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर येथील रुग्णसंख्येपेक्षा अकोला येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आठळून येत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना कठोर करण्यात आल्या आहेत.

अकोला ः शहराच्या मध्यभागी असलेल्या बैदपुरा येथे ७ एप्रिल रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्याला ५० दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला. त्यानंतरही कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सारखी वाढतच आहे. काल एकाच दिवसात ७२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.  दरम्यान महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर येथील रुग्णसंख्येपेक्षा अकोला येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आठळून येत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना कठोर करण्यात आल्या आहेत.

विदर्भात अकोला अव्वल स्थानी आहे. कोरोना जोरात वाढतो आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करताहेत पण ते अपुरे पडत असताना दिसत आहे. आता आज किती वाढले आणि किती दगावले हे जणू काही ‘रुटीन’ झाले आहे. पंधरा वीस पॉझिटिव्ह आणि एक दोन जण दगावल्याची बातमी अधिकृत आली की रोज वाऱ्यासारखी पसरते. जसे आम्हला काही होणारच नाही. आणि मग सल्ले देऊ एक दुसऱ्याला अरे घरीच थांबा.. घरीच थांबा... आम्ही घरी असतो. मात्र, इकडे शहराची वाट लागते हे सुध्दा बरोबर नाही. एक जागरुक नागरिक म्हणून मन अस्वस्थ होतेच. यावर उपाय काय तर उपाय आहे ऍक्शन प्लॅन ज्याला आपण जलद गती कृती आराखडा म्हणू शकतो. ! तो तयार करावा लागेल. यासाठी काही प्रस्ताव आहेत.

ते असे...
१) मृतकाचा रिपोर्ट दहा बारा तासात द्या, कारण तीन दिवसात बरेच काही घडून जाते.
२) डॉक्टरांनी दिवसातून कोरोना वॉर्डात तीन चारदा भेट देऊन तपासणी करावी. शिकाऊ दूरच बरे 
३) खासगी डॉक्टर, दवाखाने अधिग्रहित करून त्यांना कामाला लावा
४) ज्या भागात रुग्ण आढळला त्याच्या कुटुंबातील सदस्यासह परिसरात ट्रेसीग, टेस्टिंग व ट्रीटमेंट या ट्रिपल टी वर भर देण्यात यावा
५) लक्षणे असणाऱ्या जसे सर्दी, खोकला, ताप यासाठी वेगळी व्यवस्था करून तपासणी करावी जेणे करून गोंधळ वाढणार नाही
६) बँक,सरकारी कार्यालय व मोठ्या दुकानात टोकन पद्धत करा जेणेकरून एकाचवेळी गर्दी होणार नाही.
७) पोलीस, मनपा अधिकारी, कर्मचारी, आरोग्य यंत्रणा यांच्या मुक्कामाची सोय करून त्यांचे रोज किंवा दोन दिवसाआड चेकअप हवे
१०) कोरोना मुक्ती अभियान सात दिवसाचा राबविण्यात यावा. यात अकोलकर नागरिकांचा सहभाग हवा. 
११) भयमुक्त समाज घडविण्यासाठी कंटेंमेन्ट झोन कमी करून व पोलिसांची संख्या वाढवून कुणालाही एक दुसऱ्याच्या संपर्कात येऊ देवू नये.
अश्या प्रकारे आपण ॲक्शन प्लॉनची अंमलबजावणी केली तर हे आटोक्यात येऊ शकते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient numbers beyond Akola Nagpur, How much has increased and how much has been deceived today is becoming a 'routine', action plan is needed