कोरोना योद्ध्यांची काळजी घेणारा असाही एक योद्धा!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

कोरोना विषाणू विरोधात लढत आहे. प्रत्येकालाच स्वतःची व कुटुंबाची काळजी वाटत आहे. त्यातही आरोग्य, पोलिस, मनपा कर्मचारी हे कोरोना योद्धे निस्वार्थपणे लढा देत आहे. या योद्ध्यांची काळजी घेणारे योद्धेही पडद्या मागून सेवा देत आहेत. त्यात अकोल्यातील जुने शहरातील किरणा व्यावसायिक डिम्पल कव्हळे यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागले.

अकोला : सर्व जग कोरोना विषाणू विरोधात लढत आहे. प्रत्येकालाच स्वतःची व कुटुंबाची काळजी वाटत आहे. त्यातही आरोग्य, पोलिस, मनपा कर्मचारी हे कोरोना योद्धे निस्वार्थपणे लढा देत आहे. या योद्ध्यांची काळजी घेणारे योद्धेही पडद्या मागून सेवा देत आहेत. त्यात अकोल्यातील जुने शहरातील किरणा व्यावसायिक डिम्पल कव्हळे यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागले.

 

कोरोना महामारीमध्ये जुने शहरातील शिवनगर येथील डिम्पल कव्हळे (आर. के. टेलर) हे कोरोनाशी लढा देणाऱ्या योद्ध्यांच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देत आहे. त्यांचे एक छोटेसे घरगुती किराणा दुकान आहे. त्यावरच त्याच्या परिवाराचा संपूर्ण उदर निर्वाह चालतो. ते दुकानाचे काम सांभाळून सध्या कोरोना योद्ध्यांच्या सेवेत गुंतले आहेत. शिवनकलेचे कौशल्य असल्यामुळे त्यांनी व त्यांच्या संपूर्ण परिवाराने तोंडाला लावण्याचे विविध प्रकारचे कापडी मास्क तयार करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी जवळपास दोन हजार माक्स तयार केले आहेत. ते अगदी मोफत वाटली. त्यांनी डॉक्टर, पोलिस कर्मचारी, सफाई कामगार, वयोवृद्धांना हा मास्कचे वाटप केले. जुने शहरात जो मागेल त्याला त्यांनी अगदी मोफत मास्क उपलब्ध करून दिले आहे.

माझा खारीचा वाटा उचलतोय
कोरोना या जागतिक महामारीमध्ये माझा व माझ्या परिवाराचा थोडासा का होईना खारीचा वाटा म्हणून हा अल्पसा प्रयत्न करीत असल्याचे डिम्पल कव्हळे यांनी सांगितले. कुणाला मास्क पाहिजे असल्यास त्यांनी शिवनगर, समाज मंदिर जवळ, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवानही कव्हळे यांनी केले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona warrior who takes care of warriors