येथे संचारबंदी हवी कडक, आवश्‍यक वस्तू खरेदीसाठी दुपारची वेळ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

कोरोना विषाणूचा अकोला शहरातील वाढता प्रकोप बघता शिवसेनेचे जिल्हा सचिव प्रदीप गुरुखुद्दे यांनी पालकमंत्र्यांना विनंती पत्र पाठवून काही सूचना केल्या आहेत. त्यात गरजवंतच बाहेर पडतील.

अकोला : कोरोना विषाणूचा अकोला शहरातील वाढता प्रकोप बघता शिवसेनेचे जिल्हा सचिव प्रदीप गुरुखुद्दे यांनी पालकमंत्र्यांना विनंती पत्र पाठवून काही सूचना केल्या आहेत. त्यात गरजवंतच बाहेर पडतील, अशी वेळ पुढील 15 दिवसांसाठी निश्‍चित करून संचारबंदीचे काटेकोर पालन करण्याबाबत विनंती केली.

 

अकोला शहरात जनता कर्फ्यू 1 ते 6 जूनपर्यंत लावण्यासंदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून मुख्य सचिवांकडे परवानगी मागण्यात आली आहे. मात्र तो फार प्रभावी राहण्याची शक्यता नाही, असे गुरुखुद्दे यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. त्या ऐवजी कर्फ्यू 1 ते 15 जूनपर्यंत असावा. मात्र याकाळात जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठीची वेळ ही दुपारी 1 ते 3 अशी ठेवण्यात आली. या काळात कडक उन्ह राहत असल्यामुळे ज्यांना खूप गरजेचे आहे तेच लोक बाहेर पडतील, असा दावाही त्यांनी केला आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हे आवश्‍यक असल्याचेही ते म्हणाले. या काळात शेतकरी, मेडिकल, किराणा सोडून सर्व व्यवसाय बंद ठेवली तरी चालेल. एकदा अकोला जिल्हा ग्रीन झोनमध्ये आलो की टप्प्या-टप्प्याने सर्व व्यवहार सुरू करता येतील, असे गुरुखुद्दे यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

संचारबंदीचे हवे काटेकोर पालन
शहरात जनता कर्फ्यू लावताना संचारबंदीचे काटेकोरन पालन होईल, यासाठी उपाययोजना करण्याची आवश्‍यका असल्याचे गुरुखुद्दे यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. संचारबंदीदरम्यानची शिथिलता विषाणू संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे यापूर्वी शहरात सिद्ध झाले आहे. त्यामुळे काटेकोर पालन आवश्‍यक असल्याची विनंती त्यांनी केली.

रुग्णांची वाहतूक शासकीय वाहनातूनच
संचारबंदीच्या काळात औधष खरेदी व दवाखानाच्या नावाने अनेक नागरिक बाहेर पडताना दिसतात. त्यामुळे यापुढे एमर्जन्सी पेशण्टला रुग्णालयात नेण्यासाठी शासकीय रुग्णवाहिकाच पाठविण्यात यावी. त्यामुळे दवाखान्याच्या नावावर कोणीही रस्त्यावर दिसणार नाही. संसर्ग झालेले नागरिकही रस्त्याने फिरणार नाही. रुग्णांची वाहतूक शासकीय वाहनातूनच झाले तर संसर्ग नियंत्रणात आणता येईल, अशी सूचनाही गुरुखुद्दे यांनी केली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Curfew is required here, noon for shopping for essential items