अकोल्यात माजी आमदाराला कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

कोरोनाची महामारी आली आणि सगळे भयग्रस्त झाले. सामान्य माणसाची मदत करण्यासाठी अनेक हात अकोल्यात सरसावले होते. त्यात अग्रेसर होते भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ जगन्नाथ ढोणे. रविवारी सकाळी त्यांचा कोरोना पॉझिटिव्हचा रिपोर्ट आला.

अकोला : कोरोनाची महामारी आली आणि सगळे भयग्रस्त झाले. सामान्य माणसाची मदत करण्यासाठी अनेक हात अकोल्यात सरसावले होते. त्यात अग्रेसर होते भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ जगन्नाथ ढोणे. रविवारी सकाळी त्यांचा कोरोना पॉझिटिव्हचा रिपोर्ट आला आणि सगळ्यांना धक्काच बसला. 

 

कोरोना संकटात त्यांना लोकांची मदत करीत कमीतकमी दहा हजार मास्क आणि तेवढाच आयुर्वेदिक काढा  वाटला आहे. त्यांनी संस्थेकडून पीएम केयर आणि सीएम केयर फंडामध्ये डोनेशन देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण सर्व मित्रमंडळीने त्यांना मास्क निर्मिती करून वाटप करण्यासाठी सांगितले होते. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आयुर्वेदिक काढ्याचे तर मास्क वितरण शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते गेल्या एप्रिल महिन्यातच पार पडले होते. पण म्हणतात ना निसर्गाची रीतच न्यारी असते. त्यांनाही कोरोनाने सोडले नाही. त्यातल्या त्यात डॉ. ढोणे हे एम. एस. सर्जन आहेत.

 

‘आम्ही युवाराष्ट्र’च्या माध्यमातून जनजागृती

गेल्या दोन महिन्यांपासून ‘आम्ही युवाराष्ट्र’च्या माध्यमातून कोरोना विषयी जनजागृती करीत आहोत. सावधान रहा, सतर्क रहा, ही महामारी आहे. चूक भूल कधीच माफ करणार नाही. सध्या डॉ जगन्नाथ ढोणे यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, त्यांचा प्रकृती स्थिर आहे. लवकरच ते या संकटातून मुक्त होतील अशी प्रार्थना त्यांच्या चाहत्यांनी केली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA infected with corona in Akola