अरे हे काय, एकच माक्स सारेच घालून बघतात...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

कोरोना विषाणू कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी माक्स घालूनच घराबाहेर पडा, अशी सूचना प्रशासनाच्या वतीने वारंवार केली जात आहे. मास्क कोणता व कसा वापरावा याचेही निकष आहेत. मात्र नागरिकांनी सर्व निषक गुंडाळून ठेवले असून, अगदी रस्त्यावरही माक्स खरेदी सुरू आहे. विशेष म्हणजे, खरेदी करताना एकच माक्स अनेक जण लावून बघत असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो आहे. 

अकोला : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर माक्स लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. स्वतःच्या सुरक्षेसाठीही नागरिकांनी माक्सचा वापर योग्य प्रकारे करणे गरजेचे असताना अकोल्यात मात्र रस्त्यावरच मास्क विक्री सुरू आहे. त्यातही कहर म्हणजे रस्त्यावर गॉगल खरेदी करताना घालून बघावा तसे माक्स चांगला दिसतो का म्हणून एकच मास्क अनेक जण तोंडाला लावून बघत आहे. तोच माक्स एक ग्राहक निघून गेल्यानंतर दुसरा ग्राहकही लावून बघत असल्याने सुरक्षेचे सर्व निकष धाब्यावर बसवले जात असल्याचे दिसून येत आहे.   

 

 

निरोगी व्यक्तींना माक्स वापरण्याची गरज नाही
जे आजारी आहेत आणि ज्यांना संसर्गाची लक्षणं आहेत, त्यांनी चेहऱ्यावर मास्क बांधावेत, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. मात्र, निरोगी व्यक्तींनी मास्क बांधण्याची गरज नाही. कोरोना संशयितांची काळजी घेणारे किंवा ज्यांना खोकला आणि शिंका येत असतील, अशा लोकांनीच मास्कचा वापर करावा, अशा सूचना संघटनेकडून यापूर्वी देण्यात आलेल्या आहेत. एवढंच नाही तर संघटनेने यावरही भर दिला आहे की मास्क बांधण्याचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही वारंवार स्वच्छ हात धुवून मास्क वापराल आणि वापरानंतर त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जाईल. तोंडातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबातून म्हणजेच ड्रॉपलेट्समधून विषाणूची लागण होते, या आधारावर हे अंतर ठरवण्यात आलेलं आहे. बहुतांश ड्रॉपलेट हवेत विरून जातात किंवा संबंधित व्यक्तीच्या आसपास खाली जमिनीवर पडतात, असं आतापर्यंत मानलं जात होतं.

मास्क वापरण्याचीही योग्य पद्धत 
मास्कने नाक पूर्णपणे झाकलं गेलं पाहिजे. मास्क ओलसर किंवा दमट (moist) झाल्यास त्यातून संसर्गाचे विषाणू आत जाऊ शकतात. मास्क काढताना त्यावरचे जंतू तुमच्या तळहात किंवा बोटांना लागणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. याशिवाय मास्क पूर्णवेळ घालून ठेवावा लागतो. मास्क वापरायचा आणि नंतर सिगारेट ओढण्यासाठी, खाण्या-पिण्यासाठी तो सारखा काढायचा, असं नसतं. मास्क योग्य पद्धतीने बांधले, वारंवार बदलले, काढताना योग्य पद्धतीने काढले, त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली आणि स्वच्छतेच्या जागतिक निकषांचं पालन करत ते वापरले तरच त्याचा उपयोग होतो. दीर्घकाळ मास्क वापरणाऱ्यांपैकी अनेकांचं नंतर नंतर मास्क वापरण्याच्या नियमांकडे दुर्लक्ष होतं आणि हलगर्जी होते, असंही एका संशोधनात आढळून आलं आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hey, what is this, only one Mask wears it all At Akola city