esakal | स्वाभिमानीने महावितरण समोर केली वीजबिलांची होळी, लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करा अन्यथा कार्यालय पेटवू : रविकांत तुपकर
sakal

बोलून बातमी शोधा

akola buldana news Holi of electricity bills in front of MSEDCL by Swabhimani, forgive electricity bills during lockdown period, otherwise the office will be set on fire: Ravikant Tupkar

  राज्यात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्यातील घरगुती वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अव्वाच्या सव्वा दराने वीजेची आकारणी झाल्याने सर्वसामान्यांची वीज बिले दुप्पट व तिप्पट आलेली आहेत. यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. या अन्यायकारक बिलांबाबत महावितरणचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात विद्युत वितरणच्या जिल्हा मुख्यालयासमोर वीज बिले जाळून त्यांची होळी करण्यात आली.

स्वाभिमानीने महावितरण समोर केली वीजबिलांची होळी, लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करा अन्यथा कार्यालय पेटवू : रविकांत तुपकर

sakal_logo
By
अरूण जैन

बुलडाणा :  राज्यात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्यातील घरगुती वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अव्वाच्या सव्वा दराने वीजेची आकारणी झाल्याने सर्वसामान्यांची वीज बिले दुप्पट व तिप्पट आलेली आहेत. यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. या अन्यायकारक बिलांबाबत महावितरणचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात विद्युत वितरणच्या जिल्हा मुख्यालयासमोर वीज बिले जाळून त्यांची होळी करण्यात आली.

वाढीव बिले माफ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आज फक्त वीजबिले जाळली, जर विज बिले माफ केली नाही तर विज कंपनीचे कार्यालयही जाळू असा गंभीर इशाराही यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला.  

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

 कोरोना काळात ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले देण्यात आले आहे. राज्यभरात वीजबिलांचा मोठा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी व प्रा. एन.डी.पाटील यांनी वीज बिलांच्या विरोधातील आंदोलनाचे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने आज (ता. 13) तुपकर यांचे नेतृत्वात बुलडाण्यात वीजबिलांची होळी करण्यात आली.


महावितरणच्या प्रवेश द्वारासमोर नारेबाजी करत वीजबिलांची होळी करून आंदोलकांनी महावितरणच्या विरोधात रोष व्यक्त केला. त्यानंतर महावितरणचे अधिक्षक अभियंता यांच्या मार्फत उर्जामंत्री ना.नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रविकांत तुपकर यांनी अधिक्षक अभियंता यांना वाढीव वीजबिलांमुळे ग्राहकांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र संतापाची कल्पना दिली. रविकांत तुपकर म्हणाले की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने राज्यात झालेल्या लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्यातील घरगुती वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

अव्वाच्या सव्वा दराने वीजेची आकारणी झाल्याने सर्वसामान्यांची वीज बिले दुप्पट व तिप्पट आलेली आहेत. एप्रिल महिन्यापासून 5 ते 15 टक्के बिलामध्ये वाढ झालेली आहे. तसेच एकूण तीन महिन्याचे युनिट बिलामध्ये समाविष्ठ झाल्याने जादा युनिटचा फटका सर्वांनाच बसलेला आहे व लॉकडाऊनच्या काळात सर्व लघुव्यवसाय देखील बंद होते अनेकांचे दुकाने बंद असतानाही त्यांना वाढीव बिले आली आहेत. ही सर्व बिले अंदाजे असल्याने लघुव्यवसायिकांना याचा फटका बसणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी सुरू असून रोजगार देखील बुडालेला आहे.

तीन महिन्याचे वीज बील सरसकट माफ करण्यात यावे
व्यापारपेठेतील मंदीमुळे कामगार वर्गांच्या हाताला काम नाही. उद्योगधंदे बंद पडलेली आहेत. यातच घरगुती व लघु व्यावसायिकांच्या वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. वीज वितरण कंपनीने घरगुती व लघु व्यावसायिकांच्या वीज बिलांमध्ये झालेली दरवाढ त्वरीत मागे घ्यावी. आर्थिक परिस्थिती ढासळल्याने ही वीज बिले भरणे शक्य नाही. त्यामुळे तीन महिन्याचे वीज बील सरसकट माफ करण्यात यावे.

यापुढे राज्यभर महावितरणचे कार्यालय पेटवून देऊ
वीज माफीची जी काही रक्कम होईल ती रक्कम अनुदान म्हणून महावितरणला राज्य सरकारने द्यावी. तसेच कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही थकीत वीज बिलांची वसुली करू नये. जबरदस्तीने वसुली केल्यास व विज बिले माफ न केल्यास, आज फक्त वीजबिलांची होळी केली यापुढे राज्यभर महावितरणचे कार्यालय पेटवून देऊ असा गंभीर इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला. सदर आंदोलनावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. या आंदोलनात राणा चंदन, पवन देशमुख, शेख रफिक शेख करीम, दत्तात्रय जेउघाले, आकाश माळोदे, समाधान धंदर, कडूबा मोरे, गोपाल जोशी, संदिप जेउघाले यांच्यासह शेतकरी व महिला तसेच स्वाभिमानीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

(संपादन - विवेक मेतकर)