एकाच दिवसात बुलडाण्यात आढळले आठ कोरोना पाॅझिटिव्ह

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 1 June 2020

देशभर व राज्यभरात कोरनाचा कहर सुरू असतानाच बुलडाणा जिल्ह्याची  चिंता वाढवणारी एक बातमी हाती आली आहे.  यामध्ये आजवर सर्वाधिक म्हणजे आठ रुग्ण बुलडाण्यात गेल्या चोवीस तासात पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.  दोन आठवड्यापूर्वी बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी होत असल्याचे रात्री उशीरा झालेल्या माहितीनुसार साखरखेर्डा येथे 1, मलकापूर तालुक्यात  5  तर मोताळा तालुक्यात 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. 

बुलडाणा : देशभर व राज्यभरात कोरनाचा कहर सुरू असतानाच बुलडाणा जिल्ह्याची  चिंता वाढवणारी एक बातमी हाती आली आहे.  यामध्ये आजवर सर्वाधिक म्हणजे आठ रुग्ण बुलडाण्यात गेल्या चोवीस तासात पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

 दोन आठवड्यापूर्वी बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी होत असल्याचे रात्री उशीरा झालेल्या माहितीनुसार साखरखेर्डा येथे 1, मलकापूर तालुक्यात  5  तर मोताळा तालुक्यात 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. 

सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे 1 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार इतर माहिती मिळाली. त्यात मलकापूर शहरात 4, धरणगाव येथे 1  व शेलापूर खुर्द येथील 2 व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याचे  कळते.
 मोताळा तालुक्यातील शेलापूर खुर्द येथील 'त्या' दोन व्यक्ती येरळी येथील 'त्या' रुग्णाच्या हायरिस्क संपर्कातील असल्यामुळे दोन दिवसापूर्वीच बुलडाणा येथे त्यांना कोविद रुग्णालयात हलवून, त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट प्राप्त झाला असून, ते पॉझिटिव्ह निघाले आहेत.

दरम्यान साखरखेर्डा येथून कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या व्यक्तीच्या हायरिस्क संपर्कातील 19 जणांना रात्रीच तातडीने बुलडाणा येथे तपासणीसाठी आणण्यात आले आहे. आता एकाच रात्रीत आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने त्यांच्या संपर्कातील लोकांना शोधून काढण्याचे काम प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight corona positives were found in the buldana in a single day akola marathi news