esakal | अरेरे! हंगामापूर्वीच वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा, सोसाट्याच्या वाऱ्यात पहा कसे झाले नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Rain with gusts before the season, see how the damage was done in the winds of buldana akola marathi news

हंगामापूर्वीच वादळी वाऱ्यासह पावसाने मेहकर, सिंदखेडराजा, लोणार तालुक्‍यातील काही भागात हजेरी लावली. सुसाट्याच्या वाऱ्यामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान तर झालेच शिवाय घरावरील टिनपत्रे उडण्याच्या घटनाही घडल्या आहे. सदर वादळी वाऱ्यामुळे कुणीही जखमी झाले नसले तरी, आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, पावसामुळे मे महिन्याच्या उकाड्यातून काही प्रमाणात थंडावा वातावरणात निर्माण झालाचा अनुभव नागरिकांना आला.

अरेरे! हंगामापूर्वीच वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा, सोसाट्याच्या वाऱ्यात पहा कसे झाले नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

साखरखेर्डा/लोणार, (जि.बुलडाणा)  : हंगामापूर्वीच वादळी वाऱ्यासह पावसाने मेहकर, सिंदखेडराजा, लोणार तालुक्‍यातील काही भागात हजेरी लावली. सुसाट्याच्या वाऱ्यामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान तर झालेच शिवाय घरावरील टिनपत्रे उडण्याच्या घटनाही घडल्या आहे. सदर वादळी वाऱ्यामुळे कुणीही जखमी झाले नसले तरी, आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, पावसामुळे मे महिन्याच्या उकाड्यातून काही प्रमाणात थंडावा वातावरणात निर्माण झालाचा अनुभव नागरिकांना आला.


वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह मेहकरमध्ये आज (ता.३१) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस पडला. दुपारी उन्हाचा पारा चांगलाच तापलेला असताना अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी वारा व विजेचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरचे टीन पत्रे उडाली. सिंदखेडराजा तालुक्‍यातील साखरखेर्डा आणि परिसरात आज (ता.31) दुपारी 5.35 चे सुमारास हवामानात एकदम बदल होऊन वादळी वारे वाहू लागले व वादळी पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे येणाऱ्या हंगामासाठी खरीपपूर्व पेरणीसाठी शेतीकामात मग्न असणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांची तारांबळ उडाली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सुमारे 40 मिनिटे वादळासह धो धो पाऊस बरसला व नंतर वादळाने थोडीशी विश्रांती घेत पावसाच्या जोरदार सरी सायंकाळी 6.05 पर्यंत बरसतच होत्या. या पावसामुळे परिसरात थोड्याफार प्रमाणात आलेल्या आंबा पिकाबरोबर काही ठिकाणी काढावयास राहिलेल्या उन्हाळी हायब्रीड पिकाचे व कडब्याचे नुकसान झाले आहे.सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीजही लगेचच गुल झाली.वाऱ्यामुळे नागरी वस्तीतील एक आंब्याचे झाड उलथून पडले. मात्र अंगाची लाही लाही करणाऱ्या अतितप्त उन्ह व गरमीपासून लोकांची सुटका झाली आहे.

या पावसामुळे तापमानात मोठी घट झाल्याने नागरिकांना गरमीपासून मुक्तता झाली आहे. सुमारे 38 मिनिटे म्हणजे 6.07 पर्यंत जोरदार पाऊस होऊन नंतर रिमझिम सुरूच होती. गेल्या आठवड्यापासून दररोज लहूर वाढत्या उकाड्याने नागरीक हैराण झाले असतानाच आज (ता.31) 4 वाजेदरम्यान विजेच्या गडगडासह रिमझिम पावसाला सुरवात झाली. अचानक आलेल्या पावसाने शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली. उकड्या पासून नागरिकांना दिलासा मिळाला. यावर्षी मॉन्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे सुरू झाली नव्हती. अचानक वातावरणातील बदलामुळे यावेळी पावसाळा लवकर सुरू होणार असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकरी वर्गामधून समाधान होत आहे.

 वादळासह पावसाचे संकेत
येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जिल्ह्यासह लगत वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने वर्तविला आहे. पूर्व मौसमी वारे तयार झाले असून, अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, शेती कामे करताना शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 मेहकर बायपासवरील अनेक हॉटेलचे नुकसान
मेहकरमध्ये सायंकाळी 5 वाजेदरम्यान जोरदार पाऊस पडला. बायपासवरील हॉटेलचे वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अंत्री देशमुख गावाकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये झाड पडल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली होती. यावेळी आमदार संजय रायमुलकर यांनी नुकसान झालेल्या हॉटेलची पाहणी केली. सारंगपूर येथे अनेक घरावरील पत्रे उडाली होती. सारंगपूर बायपास जवळील चौफुलीवर असलेल्या भास्कर राऊत यांच्या मोगरा हॉटेलसह साई हॉटेल व इतरही हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही हॉटेल वादळी वाऱ्यामुळे उडून शेतामध्ये पडल्या.