
वाशीम : निसर्गाने स्त्रीला स्त्रीत्व बहाल केले आहे. याबरोबरच मातृत्वही बहाल झाले. मातृत्वाच्या मायेने संपुर्ण विश्व उभे राहीले असताना स्त्रीत्वाने विरत्वाची प्रचिती देत मोठमोठ्या लढ्यांमध्ये नेतृत्वही सक्षमपणे केले आहे. मालेगाव तालुक्यातील पिंपळवाडी जवळील जंगलात राजुरा येथील विरांगणांचा इतिहास सांगत आजही तीन शिळा उभ्या आहेत.
मातृत्वाने नेतृत्व करून विरत्व जन्माला घातल्याच्या घटनांनी इतिहासाची पाने भरलेली आहे. काकण घातलेल्या हातात तलवार पकडून इतिहास बदलण्याची धमक अनेक विरांगणांनी दाखविली आहे. मालेगाव तालुक्यातील पिंपळवाडीचे जंगल विदर्भातील इतर जंगलासारखेच पानझड मात्र या जंगलाच्या एका टोकावर दगडात कोरलेल्या स्त्री प्रतिमांच्या तिन शिळा महिलांनी गाजविलेल्या शौर्यांची स्तंभ म्हणून अचल उभे आहेत.
मालेगाव तालुक्यातील राजुरा राव हे ऐतिहासिक गाव म्हणून ओळखले जाते. मात्र याच गावात मध्ययुगीन काळापासून एक शौर्यकथा पिढी दर पिढी सांगितली जाते. राजुर्याचे राजूरकर तसे मध्ययुगीन काळापासून बडे प्रस्थ आजही राजुरकरांचा वाडा यांच्या ऐश्वर्याची महती सांगतो. याच राजूरकर घराण्यातील धाडसी स्त्रियांनी गाजविलेल्या शौर्याच्या कथा राजुरकरांसाठी व जिल्ह्यासाठी शौर्याची बिरूद म्हणून ओळखले जातात. अनेक पिढ्यांपासून सांगितली जाणारी शौर्य कथा अशी होती की 200 ते 250 वर्षापूर्वी राजुरकरांच्या घरची पुरुष मंडळी काही कामांनिमित्त बाहेर गेली होती. ही माहिती मिळताच काही दरोडेखोर राजुरकरांच्या वाड्यावर चालू गेली. मात्र वाड्यावर राहणार्या दोन धाडसी स्त्रियांनी पुरुषांच्या वेश परिधान करून लढण्याचा निर्धार केला.
या दोन विरागणांनी आपल्या शौर्याने या दरोडेखोरांना हुसकावून लावले. पिंपळवाडीच्या जंगलापर्यंत या दरोडेखोरांचा पाठलाग केला. या पुरुषी वेशातील स्त्रियांच्या शौर्यापुढे दरोडेखोर जंगलात पळाले. दरोडेखोर गेल्याचे पाहून या दोन स्त्रिया आपसात बोलू लागल्या. त्याच्या बोलण्यावरून आपल्याला हुसकावून लावणारे दोन वीर घोडेस्वार पुरुष नसून महिला आहेत. हे झाडीत लपलेले दरोडेखोरांना समजले.
त्यांनी चवताळून या महिलांवर हल्ला केला. प्राणांतिक लढा देत या दोन महिलांनी मुकाबला केला. मात्र त्या लढता लढता धारातीर्थी पडल्या. या विरांगणांच्या शौर्याची साक्ष म्हणून तत्कालीन राजूरकर घराण्याच्या पुरूषांनी याच जंगलात शौर्यस्तंभ उभारले. तेव्हापासून पिंपळवाडीच्या या जंगलातील दोन शौर्यस्तंभ मातृत्वाच्या विरत्वाची कहानी सांगत आजही उभे आहेत. सत्यशोधक समाजाने या शौर्यस्तंभाच्या जपणुकीसाठी प्रयत्न केले. विक्रमराव राजूरकर यांनी या स्तंभांचा जीर्णोद्धार केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.