धक्कादायक : कोरोनामुक्त झालेल्या या जिल्ह्यात आता उद्रेक सुरू; तब्बल ऐवढे रुग्ण पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

आतापर्यंत 1872 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 130 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी पाच मृत आहे.

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 132 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 120 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 

प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे भीमनगर, मलकापूर येथील 16 व 20 वर्षीय तरूणी, 9 वर्षीय मुलगा, 30 वर्षीय पुरूष रूग्णाचे आहेत. तसेच पारपेठ, मलकापूर येथील 43 वर्षीय पुरूष, 59 वर्षीय पुरूष, हेडगेवार नगर, मलकापूर येथील 36 वर्षीय पुरूष, धोंगर्डी ता. मलकापूर येथील 70 वर्षीय वृद्ध महिला, 62 वर्षीय वृद्ध पुरूष रुग्णाचे आहेत. त्याचप्रमाणे हनुमान चौक, मलकापूर येथील 8 महिन्याचे बाळ व 27 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. तसेच ब्राम्हणचिकना ता. लोणार येथील 30 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशाप्रकारे 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

महत्त्वाची बातमी - जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात करत होते हे अवैध काम अन् गुलाबी पाण्याजवळच...

त्याचप्रमाणे आज चार रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड केअर सेंटर येथून सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये शेलापूर, ता. मोताळा येथील 50 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरूष, मच्छी ले आऊट, बुलडाणा येथील 36 वर्षीय पुरूष व भीमनगर, मलकापूर येथील 25 वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत 81 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 81 आहे. सध्या रुग्णालयात 44 कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार  सुरू आहेत.

तसेच आतापर्यंत 1872 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 130 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी पाच मृत आहे. तसेच आज 15 जून रोजी 132 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 12 पॉझिटिव्ह, तर 120 निगेटिव्ह आहेत. आज रोजी अहवालाच्या प्रतीक्षेत असलेले नमुने 18 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1872 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are a total of 130 corona patients in buldana district akola marathi news