लॉकडाऊनचे सुखद परिणाम; रिकाम्या हातांना दिला शेवटी शेतीनेच आधार!

washim
washim
Updated on

वाशीम ः कोरोनाच्या प्रकोपानंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनने मोठमोठे उद्योगधंदे बंद झाले. त्याबरोबच पदपथावर सटर-फटर व्यवसाय करून गुजराण करणारे लघु व्यवसायिकही बेकार झाले. चुली थंडावल्या. मात्र, यातूनही मातीतील ओलाव्याने लघु व्यावसायीकांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याने विझलेल्या चुली पुन्हा पेटल्या आहेत. 

लॉकडाऊनमुळे शहरीभागातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. हातावर पोट असणारे व्यवसायही बंद पडले. केशकर्तनालय, चहाच्या टपर्‍या, पानटपर्‍या, पदपथावर सटर-फटर व्यवसाय करणारे लघु व्यवसायिक यांना घरीच बसावे लागले.

या लघुव्यवसायामधून येणारे उत्पन्न केवळ दोन वेळचे पोट भरण्यापुरते येत असल्याने लॉकडाऊनने अनेक चुली विझल्या होत्या. मात्र, शेवटी परिस्थिती जगायला शिकविते. या न्यायाने या लघुव्यवसायिकांनी पर्याय शोधला आहे. हा पर्याय शेवटी मातीकडे घेऊन जाणारा असून, मातीतील ओलाव्याने शहरीभागातही पोटातील भूक शमविण्याची क्षमता आहे. हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. पाणीपुरी विकणार्‍या लघु व्यावसायिकांनी आंबे विक्रीचा व्यवसाय थाटला आहे. तर चहाच्या टपरीसमोर टपरी चालकाने भाजीपाला विक्री सुरू केली आहे. हातगाडीवर लहान मुलांचे कपडे विकणारे लघु व्यावसायिक हातगाडीवरच भाजीपाला घेऊन त्याची घरपोच विक्री करीत आहेत. बदलेल्या परिस्थितीमध्ये व्यवसायाचे स्वरूपही बदलले असून, शहरीभागातील नागरिकही थेट शेतकर्‍याकडून आलेला शेतमाल खरेदी करीत आहेत. परिणामी, शेतकर्‍यांनाही त्याचा फायदा होत आहे. एरव्ही लिलावात शंभर रुपयाला जाणारी भाजी किरकोळ विक्रीतून 500 रुपये मिळवून देत आहे. 

ऑनलाईन व्यवसायही जोमात
लॉकडाऊनमुळे व्यवसायाचे संदर्भ बदलले आहेत. ज्या शेतकर्‍यांकडे दर्जेदार शेतमाल आहे. त्या शेतकर्‍यांनी समाजमाध्यमांच्या माध्यमातून ऑनलाईन विक्रीसुरू केली आहे. समाजमाध्यमांवरून ऑर्डर मिळाल्यानंतर त्या ग्राहकाला घरपोच गहू, तांदूळ, डाळ, भाजीपाला पुरविला जात आहे. मालही दर्जेदार मिळत असल्याने ग्राहकही खुश आहेत. तर शेतकर्‍याला उचीत किंमत मिळत असल्याने काही शेतकर्‍यांनी या लॉकडाऊनचे आभार मानले आहेत. 
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Superintendent of Police Kumar Chinta instructed school heads to install CCTV cameras, maintain complaint boxes and ensure proper verification of school transport staff.
His sacrifice has left his native village Marartola and Kurkheda taluka mourning.
Invitations Distributed, Venue Ready—But Groom Never Arrived Over Dowry Dispute
Young Voice, Strong Resolve: Namrata's Journey to Jantar Mantar Inspires Fellow Students
Marathi News Esakal
www.esakal.com