
वाशीम : वाकाटकाची राजधानी असलेल्या वाशीम शहर ब्रिटीश अंमलाखालीही जिल्हा म्हणून प्रख्यात होते. वाशीम शहराच्या उत्तम भौगोलिक स्थानामुळे इंग्रजांसाठी बुलडाण्यानंतर वाशीम हे थंड हवेचे ठिकाण होते. याच वाशीम शहरात ख्रिस्ती स्मशानभूमीत अशीच एक कबर आहे. ही कबर जिच्यासमोर उभे राहिल्यानंतर तिचा इतिहास सांगते.
पूर्वश्रमीचे बासम हे नाव इंग्रजकाळामध्ये वाशीम शहराला होते. इंग्रजाच्या अंमलाखाली 1903 पर्यंत वाशीम हे जिल्ह्याचे ठिकाण होते. काही काळानंतर मात्र जिल्ह्याचे डिमोशन होऊन वाशीम पुन्हा तालुक्याचे ठिकाण झाले. मात्र, इंग्रजकाळातील इतिहासाच्या अनेक खुणा, घटनांचे पडसाद येथील पुरातन वास्तूतून अनुभवता येतात. वाशीम शहराच्या आययूडीपी ते जुने न्यायालय या रस्त्यावर ख्रिस्ती स्मशानभूमी आहे.
इंग्रजकालीन कोरीव दगडांचे प्रवेशद्वार सध्या भग्न अवस्थेत असले तरी, येथील काही थडगी मात्र स्थापत्य कलेचा नमुना ठरावा अशी आहेत. येथील ब्रिटीश बांधणीच्या एका थडग्यावरचा मजकूर तत्कालीन ब्रिटीश पोलिस अधीक्षकांच्या मृत्यूचे रहस्य व जिल्ह्याबाहेरील भौगोलिक वन्यसंपदेचा इतिहास सांगते. येथील हे थडगे सन 1800 मधील आहे. सव्वाशे वर्षाचा कालावधी उलटला तरी त्या थडग्याच्या समोर उभे राहिल्यानंतर हे थडगे त्यावरील मजकुराच्या सहाय्याने आपल्याशी जणू संवाद साधते. वाशीम जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक इव्हन रॉबर्ट क्रिस्टीन याचे आहे.
ते एकदा वाघाच्या शिकारीसाठी पांढुर्ण्याच्या जंगलात गेले असता, त्यांचे अचानक वाघाशी झडप झाली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना वाशीमला परत आणल्यानंतर त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर वर्हाडातील त्यांच्या एका मित्राने त्यांचे थडगे बनविले. त्या थडग्यावर ‘इव्हन क्रिस्टीन यांचा मृत्यू कशामुळे झाला याचा उल्लेख आहे.’ बेरार प्रांतातील त्याच्या मित्राने हे थडगे बनविल्याचा मजकूर आजही त्या कबरीवर दिसतो. या कब्रस्तानामध्ये कबरीच्या गर्दीत घोटीव दगडांनी बनवलेली इव्हन रॉबर्ट क्रिस्टीन याची ही कबर इंग्रजाचा इतिहास सांगते.
हा ठेवा जपला जावा
वाशीम शहरामध्ये अनेक इंग्रजकालीन इमारती आजही सुस्थितीत व वापरात आहेत. मात्र, जुन्या न्यालायाच्या परिसरात असलेली फाशीची विहिर, जुन्या न्यायालयाच्या उत्तुंग इमारतीचा काही भाग नामशेष झाला आहे. तसेच आययूडीपी भागात असलेले क्रिस्ती समाजाचे जुने कब्रस्तान स्थापत्य कलेचा अदभूत नमुना आहे. हा वारसा जपणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.