काय म्हणता ! जगप्रसिद्ध लोणार सरोवरच्या पाण्याचा रंग झाला लाल? नेमके काय झाले? वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग मागील काही दिवसांपासून सायंकाळी लाल दिसू लागला आहे. त्यामुळे हे नयनरम्य दृष्य पाहण्यासाठी सायंकाळी सरोवर परिसरात नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. मात्र, हा रंग लाल का दिसतो याबाबत संशोधन होण्याची गरज आहे.

लोणार (जि. बुलडाणा) : जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग मागील काही दिवसांपासून सायंकाळी लाल दिसू लागला आहे. त्यामुळे हे नयनरम्य दृष्य पाहण्यासाठी सायंकाळी सरोवर परिसरात नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. मात्र, हा रंग लाल का दिसतो याबाबत संशोधन होण्याची गरज आहे.

क्लिक करा- कुणी केले पहा लॉकडाउननंतर पहिले आंदोलन, वाचा काय होते कारण...

मातीमध्ये आहेत चुंबकीय गुणधर्म
लोणार हे जागतिक दर्जाचे बेसॉल्ट खडकापासून बनलेले एकमेव सरोवर आहे. या खाऱ्या पाण्याच्या सरोवर परिसरात असलेल्या मातीमध्ये चुंबकीय गुणधर्म आहेत. चंद्रावरील मातीचे खाऱ्या पाण्याच्या गुणधर्माशी जवळचे नाते आहे, असे जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. या सरोवराचा विविध अंगांनी अभ्यास करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून येथे संशोधक नेहमी येतात. मात्र, कोरोना विषाणूमुळे गेले तीन महिन्यांपासून लाॅकडाउन असल्यामुळे सरोवर परिसरात कोणीही अभ्यासक फिरकलेला नाही.

गेले आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाच्या दरम्यान, झालेल्या पावसामुळे आणि लॉकडाउनमध्ये थोडी ढिल दिल्यामुळे नागरिक सरोवर परिसरात फिरू लागले आहेत. गेले दोन दिवसांपासून सायंकाळी फिरताना लोणार सरोवरातील पाण्याचा रंग लाल झाल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात फिरणारे नागरिक मोबाईलमध्ये याचे चित्रण करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. पाण्याचा रंग बदलेला दिसून येत असला तरी प्रशासनाने ही बाब अद्याप गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. मात्र, पाण्याच्या रंग बदलाचे संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचे जाणकार सांगतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The water color of Lonar Lake is red