तुम्हाला माहित आहे का? शाहिर विठ्ठल उमपांच्या गाण्यातील तुंबडी कुठली आहे ती...

राम चौधरी
Wednesday, 17 June 2020

महाराष्ट्राचे प्रतिभावंत लोकगायक शाहीर विठ्ठल उमप यांच्या ‘तुंबडी भरून घ्याना’ या गाण्यातील तुंबडी नावाचे वाद्य नागपूरचे आहे. नागपूर परिसरात झाडीबोली लोकसंगीतामध्ये तुंबडी हे वाद्य वाजविले जाते. 

वाशीम ः महाराष्ट्राचे प्रतिभावंत लोकगायक शाहीर विठ्ठल उमप यांच्या ‘तुंबडी भरून घ्याना’ या गाण्यातील तुंबडी नावाचे वाद्य नागपूरचे आहे. नागपूर परिसरात झाडीबोली लोकसंगीतामध्ये तुंबडी हे वाद्य वाजविले जाते. 

शाहीर विठ्ठल उमप यांच्या अनेक अजरामर रचना महाराष्ट्राच्या लोकगीतांचा सोनेरी ठेवा आहे. कवण रचून ते साभिनय सादर करण्याची त्यांची हातोटी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करून गेली आहे. तुंबडी भरून घ्याना या लोकप्रीय गितामध्ये तुंबडी नावाचे वाद्य वाजविले आहे. इंग्रजीत आठ आकाराच्या लाकडी किंवा काशाच्या वाद्यामध्ये वाळूचे खडे भरून ते वाजविल्यानंतर एक वेगळाच ताल जन्मघेतो. हे तुंबडी वाद्य मुळात नागपूरचे आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली हा झाडीपट्टीचा भाग म्हणून ओळखला जातो. या झाडीपट्टीने राज्याच्या कलाविश्‍वात अनेक नररत्नांची भर घातली आहे. मराठी नाटक आज नाट्यगृहात महानगरापुरते मर्यादीत झाले असताना झाडीपट्टीत आजही हिवाळ्यामध्ये गावागावांत होणारे नाटकाचे प्रयोग लोककलेला जीवंत ठेवत आहेत. या नाटकांमध्ये कवण गायायच्या वेळेस आजही तुंबडी हे वाद्य वाजविले जाते. शाहीर विठ्ठल उमप यांनी हे वाद्य सातासमुद्रापार नेले असले तरी, या वाद्याचा उगम छत्रपती शिवाजी महाराजांचे हेर बहिरजी नाईक यांच्यापर्यंत जातो. पन्हाळगडाला वेढा पडला असताना तो वेढा फोडण्यासाठी ‘तुंबडी भरून घ्याना’ या गाण्यातून बहिरजींनी मावळ्यांना एक संदेश दिला होता. असा उल्लेख आहे. म्हणजेच नागपूरचे हे तुंबडी वाद्य शिवकाळातही प्रसिद्ध होते. असा उल्लेख खुद्द विठ्ठल उमप यांनी प्रत्येक गाणे सादर करण्याच्या आधी केलेला आहे. लोककलेचा हा वारसा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत मैलाचा दगड ठरला आहे. आताही झाडीपट्टीमध्ये जे जुणे कलावंत आहेत त्यांच्या वाद्याच्या भांडारामध्ये हे तुंबडी वाद्य अस्तित्वात आहे. ढोलक, पायपेटी, घुंगरमाळा व त्या तालावर तुंबडीतून निघालेले ताल पिढ्यानपिढ्या ही लोककला जीवंत करीत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Which of these is the gourd of Vitthal Umpa's song?