Akola Railway : दहा कोटींची रेल्वे जमीन अतिक्रमणमुक्त; २५ वर्षांपासूनचे ८६ अतिक्रमण हटवले; भुसावळ विभागाची कारवाई
Akola News : अकोला रेल्वे स्थानक परिसरातील सुमारे ८६ अतिक्रमणांवर रेल्वे विभागाने मोठी कारवाई केली असून ४० हजार चौ.मी. रेल्वे जमीन मोकळी करण्यात आली आहे. या जमिनीची अंदाजे किंमत दहा कोटी रुपये आहे.
अकोला : अकोला रेल्वे स्टेशनच्या परिसरात अतिक्रमण करुन ठाण मांडून राहणाऱ्या ८६ सुमारे अतिक्रमणांवर रेल्वे विभागाने कारवाई केली. त्यामुळे दहा कोटी रुपये किंमतीची जमीन अतिक्रमण मुक्त झाली.