राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावे मागितला १० लाखांचा हप्ता!

विजय ट्रान्सपोर्टच्या मालकाची पंतप्रधान, मुख्यंमत्र्यांसह १३ जणांकडे तक्रार
राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावे मागितला १० लाखांचा हप्ता!
Updated on: 

अकोला ः येथील प्रसिद्ध विजय ट्रान्सपोर्टच्या मालकाला गृहमंत्र्यांच्या नावाने दहा लाखांचा हप्ता मागितल्याची तक्रार पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून ते १३ जणांकडे करण्यात आली आहे. यात हप्तासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देवून आठ तास स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप ट्रान्सपोर्ट संचालकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध केला आहे.

अकोला येथील वाशीम बायपास रोडवरील गंगानगर येथे विजय ट्रान्सपोर्टचे कार्यालय आहे. या ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक अब्दुल आसिफ अब्दुल कदिर हे वडिलोपार्जित ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे ८० ट्रक असून, देशभरात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक त्यांच्या ट्रकमधून होते. त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्य व केंद्राचे गृहमंत्री, पोलिस महासंचालक, सीबीआय प्रमुख, केंद्रीय परिवहन मंत्री, राज्याचे विरोधी पक्ष नेते, राज्याचे परिवहन मंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांकडे एक तक्रार ता. २२ एप्रिल २०२१ रोजी दिली आहे.

या तक्रारीनुसार त्यांना ता. २१ एप्रिल २०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पाच कर्मचारी किशोर सोनोने, वसीम, अश्विन शिरसाट, व इतर दोन पोलिस कॉन्स्टेबल यांनी वाहनांची तपासणी करण्याच्या कारणास्तव अ. आसिफ यांच्या कार्यालयात जाऊन शिविगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांचे तीन ट्रक स्थानिक गुन्हे शाखेत आणून आठ तास डांबून ठेवले. आसिफ यांनाही कार्यालयात बसवून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, या कर्चमाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावे मागितला १० लाखांचा हप्ता!
दोन खासदार, सहा आमदार तरीही जनता बेजार!

हप्ता दिल्याशिवाय व्यवसाय करू देणार नाही!

ट्रान्सपोर्ट संचालक अ.आसिफ यांनी दिलेल्या पत्रात एलसीबीच्या कर्चमाऱ्यांकडून हप्त्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हप्ता दिल्याशिवाय तू व्यवसाय करू शकणार नाही, अशी धमकीही दिल्याचे पत्रात म्हटले आहे. याशिवाय राज्याच्या गृहमंत्र्यांना १० लाखाचा हप्ता द्यावा लागतो, त्यामुळे तू हे दहा लाख रुपये आम्हाला आणून दे, अन्यथा तुझ्यावर खोटे आरोप लावून गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिल्याचा आरोपही अ. आसिफ यांनी पत्रातून केला आहे.

राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावे मागितला १० लाखांचा हप्ता!
आधी कोरोना चाचणी, मगच पुढील प्रवास

पोलिस अधीक्षकांकडून दखल नाही

अ. आसिफ यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबतचे पत्र ता. २२ एप्रिल २०२१ रोजीच पोलिस अधीक्षक कार्यालयात दिले होते. त्या पत्राची पोलिस अधीक्षकांकडून कोणतीच दखल घेण्यात आली नसल्याचा आरोपही अ. आसिफ यांनी केला आहे.

गाड्या तपासणीच्या नावाखाली एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी शिविगाळ करून मला ता. २१ एप्रिल रोजी एलसीबी कार्यालयात डांबून ठेवले होते. ज्या गाड्या माझ्या नावावर नाही त्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर वकिलांमार्फेत सोडून घेतल्यात. पोलिसांनी एका गाडीची नंबर प्लेट काढून ठेवल्याचे लक्षात आले. त्याबाबत विचारले असता तुझ्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची धमकी दिली. गृहमंत्र्यांना हप्ता द्यावा लागतो म्हणून १० लाखांची मागणी केली. त्याची तक्रार मी सर्व संबंधितांना केली आहे.

- अब्दुल आसिफ अब्दुल कदिर, संचालक, विजय ट्रान्सपोर्ट

..........................

विजय ट्रान्सपोर्टच्या दोन गाड्या एकाच नंबरने चालविल्या जात असल्याची माहिती मिळाल्याने ते ट्रक जप्त केले आहे. त्याची चौकशी करण्यासाठी त्याला कार्यालयात बोलावले होते. त्याने पत्रातून केलेल्या आरोपांची चौकशी होऊन सत्य बाहेर येईल. त्याचे ट्रक जप्त होत असल्याने तो हप्ता मागितल्याचे खोटे आरोप करीत आहे.

- शैलेस सपकाळ, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,अकोला

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com