अकोल्यात रेल्वे कोच फॅक्‍टरीसाठी 100 कोटीचा प्रस्ताव

मनोज भिवगडे 
Saturday, 18 July 2020

जिल्ह्यातील रेल्वे विकास प्रकल्पासोबतच अकोल्यात रेल्वे कोच फॅक्‍टरी सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान ठेवला. या प्रकल्पासाठी 100 कोटी प्राथमिक निधीची तरतुद करण्यासंदर्भातही केंद्रीय राज्यमंत्र्यांनी आग्रह पकडला असून, 2020-21 या आर्थिक वर्षात त्यासंदर्भात निर्णय घेताल जाण्याची शक्‍यता आहे.

अकोला  ः जिल्ह्यातील रेल्वे विकास प्रकल्पासोबतच अकोल्यात रेल्वे कोच फॅक्‍टरी सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान ठेवला. या प्रकल्पासाठी 100 कोटी प्राथमिक निधीची तरतुद करण्यासंदर्भातही केंद्रीय राज्यमंत्र्यांनी आग्रह पकडला असून, 2020-21 या आर्थिक वर्षात त्यासंदर्भात निर्णय घेताल जाण्याची शक्‍यता आहे.
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांची अकोला रेल्वे स्थानकावरील अडचणी बाबत तसेच

अकोला जिल्हयामध्ये सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामा बाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगाडी यांचे सोबत झालेल्या व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये चर्चा केली. यात प्रामुख्याने डाबकी-गायगाव रेल्वे उड्डाण पुलाचे कामाचे प्रगती, न्यू तापडीयानगर उड्डाण पूल, अकोट रेल्वे रोड उड्डाण पूल, अकोला रेल्वे प्लॅटफॉर्मवर एस्केलेटर बसविणे, अकोला रेल्वे स्थानकावरील फुट ओव्हर ब्रिज, अकोला रेल्वे स्टेशवरील मालधक्का स्थानांतरण, अकोला रेल्वे स्टेशनवर आतमध्ये प्रवेश करण्यासाठी व निघण्यासाठी उपायोजना करणे बाबत, परिसरामध्ये सिटी बसला येण्यासाठी परवानगी देणे बाबत, रेल्वे स्टेशन परिसरात डमी इंजन बसविणे बाबत व परिसरामध्ये सुशोभिकरण ही कामे तातडीने करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सध्यस्थितीत कोविडमुळे लॉकडाउन सुरू आहे. रेल्वे सेवा बंद असल्याने ही कामे जलदगतीने करणे सहज शक्‍य आहे. अधिकाऱ्यांनी वेळेचे नियोजन करून अल्पावधीत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्र्यांनी केली.

अकोला रेल्वे स्थानकावर होम प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी 8 कोटी 95 लाखाचे प्रस्तावा तसेच 104 कोटी 95.3 लाखांचा प्रस्ताव रेल्वे कोच फॅक्‍टरी सुरू करण्यासाठी प्रस्तावितर करण्यासंदर्भातही चर्चा झाली. सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये ही तरतूद करण्याबाबत रेल्वे राज्यमंत्री आंगडी यांच्याकडे धोत्रे यांनी आग्रह धरला. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार संबंधित मुद्यांवर तत्काळ कार्यवाही करणेबाबत

सर्व संबंधित अधिकाऱ्यांना रेल्वे राज्यमंत्र्यांना निर्देश देण्यात आले. ही कामे तत्काळ झाल्यास प्रवासांसाठी सोयीचे होईल, असे संजय धोत्रे यावेळी म्हणाले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 crore proposal for Railway Coach Factory in Akola