
अकोला : जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गातील तब्बल १०१ जणांना शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदांवर समुपदेशनाने पदोन्नती देण्यात आली आहे. संबंधितांना नियुक्त जागी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनीता मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया जि.प. च्या संविधान सभागृहात गुरुवारी (ता. २४) पार पडली.