esakal | कर्जमुक्तीसाठी एक हजार ५० कोटी!, लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरण; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

1,050 crore for debt relief for akola !, soon disbursement of funds to eligible farmers' accounts; Farmers will get relief

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र परंतु, लाभ मिळणे बाकी असणाऱ्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार आहे. मंगळवारी (ता.३०) शासनाने या योजनेंतर्गत एक हजार ५० कोटी रुपये निधी वितरणासाठी मान्यता दिली आहे.

कर्जमुक्तीसाठी एक हजार ५० कोटी!, लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरण; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

sakal_logo
By
अनुप ताले

अकोला ः महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र परंतु, लाभ मिळणे बाकी असणाऱ्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार आहे. मंगळवारी (ता.३०) शासनाने या योजनेंतर्गत एक हजार ५० कोटी रुपये निधी वितरणासाठी मान्यता दिली आहे.

१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधिसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन/ फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९’ जाहीर करण्यात आली होती. या योजनेंतर्गत सन २०२०-२१ साठी सात हजार कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. या निधीतून एक हजार ५० कोटी इतका निधी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

निधी वितरणाची यांचेवर जबाबदारी
मान्यता मिळालेला निधी खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अधिनस्त सहाय्यक निबंधक, सहकार आयुक्त कार्यालय पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. लेखाधिकारी, अधिन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था पुणे यना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. हा निधी आहरण करून तो वेळेत खर्च होईल हे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी पहावयाचे असून, याबाबतचा अहवाल व खर्चाची माहिती शासनास पाठवायची आहे.