रेल्वे स्थानक विस्तारिकरणासाठी 110 कोटीचा प्रस्ताव

मनोज भिवगडे  
Thursday, 13 August 2020

पश्चिम विदर्भातील मोठी बाजारपेठ असलेले अकोला शहरातील रेल्वे स्थानकाच्या विस्तारिकरणासाठी केंद्र शासनाने ११० कोटींचा निधी मंजूर करावा, असा प्रस्ताव केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे दिला आहे.

अकोला  ः पश्चिम विदर्भातील मोठी बाजारपेठ असलेले अकोला शहरातील रेल्वे स्थानकाच्या विस्तारिकरणासाठी केंद्र शासनाने ११० कोटींचा निधी मंजूर करावा, असा प्रस्ताव केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे दिला आहे.

कोविड-१९ च्या टाळेबंदीच्या काळात रेल्वे वाहतूक बंद असताना अकोला रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरण व विस्तारीकरणाच्या कामाला गती मिळाली. रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे इंजिनची सुंदर प्रतिकृती, झाँशी, लखनौ, वाराणसीच्या धर्तीवर उभारण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे. ११० फुटाचा राष्ट्रीय ध्वज उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

रेल्वे फलाटावर प्रवाशाच्या सोयीसाठी शेडचा विस्तार, दुसऱ्या लिफ्टची निर्मिती करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकांना सोयीसाठी एस्कॅलेटर, फुटओवरब्रिजची निर्मिती करण्यात आली आहे. नवीन ओव्हर ब्रिजच्या निर्मितीमुळे फलाट १ ते ७ पर्यंत प्रवाशांना ये-जा करणे सोयीचे होणार आहे. त्याच भागात रेल्वे खिडकी उपलब्ध होणार आहे.

अकोला रेल्वे स्थानकावर होम प्लेटफार्म तयार करण्यासाठी ८ कोटी ९५लाखाचे प्रस्ताव, अकोला ते खंडवा मीटर गेज रेल्वे लाईनचे ब्रॉडगेज परिवर्तन करणे, अकोला रेल्वे स्टेशन वर ट्रेन कोचिंग परिक्षण सुविधा विकसित करण्यासाठी सन २०२०-२१ च्या बजेट मध्ये १०० कोटीचा प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांना देण्यात आला आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 110 crore proposal for Akola railway station expansion