crime
ESakal
अकोला - अवैध सावकारीच्या माध्यमातून कर्जदाराची मालमत्ता आपल्या नावावर करून घेतल्याप्रकरणी रामदास पेठ पोलिस ठाण्यात १२ जणांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकार विभागाच्या शासकीय चौकशीत संबंधित व्यवहार प्रथमदर्शनी अवैध सावकारीचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.