बाळापूर - नदीपात्रात पोहायला गेलेल्या एका १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही हृदय द्रावक घटना सोमवारी ता. २ रोजी हातरुण शेतशिवारातील मोर्णा नदीपात्रात घडली आहे. विजय गणेश कराळे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे हातरुण गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी उरळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.