Akola Accident: कावड यात्रेदरम्यान अकोल्यात ट्रॅक्टरला अपघात, १५ भाविक जखमी
Accident News: अकोल्यात कावड यात्रेदरम्यान ट्रॅक्टर उलटल्याने १५ जण जखमी झाले. सर्व जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून आमदारांनी वैद्यकीय सुविधा सुनिश्चित केल्या आहेत.
अकोला : अकोल्यात सुरू असलेल्या कावड यात्रेदरम्यान १७ आॅगस्टरोजी रात्री ११.३० च्या सुमारास डाबकी रोड परिसरात अपघात घडला. कावडधारकांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तब्बल १५ जण जखमी झाले.