
धानोरा : गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील रांगी आणि आरमोरी तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या जांभळी गावाच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रांगी-जांभळी मार्गावर वाहणाऱ्या नाल्यावर तब्बल १५ वर्षांपूर्वी पूल मंजूर करण्यात आला. पण, हा पूल आजही अर्धवट असून दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मात्र, प्रशासनाचे या पुलाकडे दुर्लक्ष आहे.