esakal | शेतकरी आत्महत्येची १६ प्रकरणं मदतीसाठी पात्र
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी आत्महत्येची १६ प्रकरणं मदतीसाठी पात्र

शेतकरी आत्महत्येची १६ प्रकरणं मदतीसाठी पात्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः नापिकी व बॅंकांकडून घेतलेल्या कर्जामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या १६ प्रकरणांना जिल्हा स्तरीय समितीने शासकीय मदतीसाठी पात्र ठरविले आहे. त्यासोतबच सात प्रकरणांना फेरचौकशीसाठी पाठवण्यात आले असून तीन प्रकरण अपात्र ठरविण्यात आले आहेत. (16 cases of farmer suicide eligible for help)

सततची नापिकी, सावकार किंवा बॅंकेकडून घेतलेले कर्ज, उत्पादनापेक्षा लागवडीचा खर्च अधिक व इतर कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. आत्महत्या करणाऱ्या या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत देण्यात येते. संबंधित मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या प्रकरण निश्चित करण्यासाठी गुरुवारी (ता.८) जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याग्रस्त समितीची बैठक पार पडली. बैठकीत एकूण २६ प्रकरण ठेवण्यात आले. त्यापैकी १६ प्रकरण मदतीसाठी पात्र जाहीर करत तीन प्रकरणांना अपात्र जाहीर करण्यात आले. याव्यतिरीक्त ७ प्रकरणांची फेरचौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत समितीचे सदस्य सचिव व इतर सदस्यांची उपस्थिती होती.

असे आहेत पात्र ठरलेले प्रकरण
नामदेव चवरे (रा. रंभापूर, अकोट), अनिल अरबट (रा. सौदळा, तेल्हारा), राहुल शेळके (रा. रूईखेड, अकोट), ज्ञानेश्वर ओळंबे (रा. कवठा बु., अकोट), चेतन गुल्हाने (रा. मूर्तिजापूर), रामधन जाधव (रा. बार्शीटाकळी), मोहन खंडारे (रा. चतारी, पातूर), श्रीराम सोनवणे (रा. बोर्डी, अकोट), अंकुश खंडारे (रा. निजामपूर, अकोट), भिकाजी इंगळे (रा. मरोडा, अकोट), गणेश राऊत (रा. उगवा, अकोला), विशाल राऊत (रा. अन्वी मिर्झापूर, अकोला), विलास भांडे (रा. लाखोडा, अकोला), रामकृष्ण फसाले (रा. हनवडी, अकोट), विजय राठोड (रा. माळराजुरा, पातूर), राजेंद्र घाटोळे (रा. कान्हेरी गवळी, बाळापूर) यांच्या आत्महत्यांच्या प्रकरणांना शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.

16 cases of farmer suicide eligible for help

loading image