2025 Sky Events : नव्या वर्षात आकाशात नवी नवलाई; उल्का वर्षाव, धुमकेतू अन् बरेच काही
Astronomical Events : प्रभाकर दोड यांनी नवीन वर्षात आकाशातील उल्का वर्षाव, धुमकेतू आणि इतर आकाशीय घटनांचे अनुभव घेण्याचे आवाहन केले आहे. या अनोख्या आकाशीय घटनेमध्ये सामील होऊन ताण-तणावापासून मुक्तता मिळवा.
अकोला : धावपळीच्या युगात दिवसभराच्या वाढविलेल्या ताण-तणावातून काही प्रमाणात मुक्त होण्यासाठी, अनंत विश्वाच्या या पसाऱ्यात सामिल होऊन नव्या वर्षात आकाशातील नवी नवलाई अनुभवण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे.