Farmer News : शेतकरी आत्महत्येची २१ प्रकरणे मदतीसाठी पात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

21 cases of farmer suicide eligible for assistance district level committee meeting akola

Farmer News : शेतकरी आत्महत्येची २१ प्रकरणे मदतीसाठी पात्र

अकोला : नापिकी व कर्जबाजीपणासह इतर कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या २१ आत्महत्या प्रकरणांना शासकीय मदतीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. त्यासोबतच चार प्रकरणांना अपात्र ठरवण्यावर जिल्हा स्तरीय समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंबंधीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली होती.

सततची नापिकी, सावकार किंवा बॅंकेकडून घेतलेले कर्ज, उत्पादनापेक्षा लागवडीचा खर्च अधिक व इतर कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. आत्महत्या करणाऱ्या या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत देण्यात येते.

संबंधित मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांचे प्रकरण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याग्रस्त समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली. बैठकीत एकूण २६ प्रकरण ठेवण्यात आले. त्यापैकी २१ प्रकरण मदतीसाठी पात्र जाहीर करत चार प्रकरणांना अपात्र जाहीर करण्यात आले. बैठकीला समितीचे अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

असे आहेत पात्र प्रकरण

आशीष महल्ले (वय ३२, रा. दुधलम, ता. अकोला), स्वाती भाकरे (वय ३२, रा. मोरगाव भाकरे, ता. अकोला), नितीन शिरसाट (वय ३५, रा. हिंगणी बु. ता. अकोला), ज्ञानेश्वर लासुरकर (वय ३६, रा. भोकर, ता. तेल्हारा), आकाश सोळंके (वय २४, रा. दहिगांव, ता. तेल्हारा), सचिन आढे (वय ४०, रा. दापुरा, ता. तेल्हारा),

भावसिंग राठोड (वय ५५, रा. बेलतळा, ता. पातूर), अजित हिवराळे (वय ३४, रा. पार्डी, ता. पातूर), बाबुसिंग चव्हाण (वय ६०, रा. झरंडी, ता. पातूर), मैनाबाई जाधव (वय ४५, रा. गावंडगांव, ता. पातूर), गणेश ठाकरे (वय ४८, रा. रूईखेड, ता. अकोट), गौरव महाले (वय २४, रा. अकोलखेड, ता. अकोट), प्रवीण इंगोले (वय ३२, रा. किनखेड पूर्णा, ता. अकोट), महादेव पातोंड (वय ४९, रा. किनखेड पूर्णा, ता. अकोट),

गोपाल गावंडे (वय ४०, रा. केळीवेळी, ता. अकोट), जयराम गवई (वय ६५, रा. अडगाव खुर्द, ता. अकोट), शुभम चोरे (वय २५, ता. अकोट), अश्विन पाचडे (वय ३०, रा. आसेगाव बाजार, ता. अकोट), राजेंद्र चव्हाण (वय ५१, रा. चंडिकापूर, ता. अकोट), दशरथ राठोड (वय ४०, रा. साखरविरा, ता. बार्शीटाकळी), अनिल सरकटे (वय ३५, रा. निंबा, ता. बाळापूर).

टॅग्स :AkolaFarmer