Ram Mandir : सव्वादोनशे वर्ष पुरातन पंचगव्हाण येथील श्रीराम मंदिर

सोमेश्वर ब्रह्मचारी महाराजांनी केली होती स्थापना; मूर्ती काळ्या पाषाणातील
225 years old ram mandir established by someshwar maharaj black stone idols of ram
225 years old ram mandir established by someshwar maharaj black stone idols of ram Sakal

तेल्हारा : तालुक्यातील पंचगव्हाण खेलदेशपांडे येथील श्रीराम मंदिराची स्थापना सतचितानंद सोमेश्वर ब्रह्मचारी महाराज यांनी सव्वादोनशे वर्षांपूर्वी केली होती. सदर मंदिर हे परिसरातील भक्तांचे आराध्यदैवत असून, उत्सवादरम्यान पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या प्रमाणात याठिकाणी येतात.

सन १८०२ साली तालुक्यातील पाच गावांचा समूह असणाऱ्या पंचगव्हाण येथील खेलदेशपांडे येथे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची स्थापना करण्यात आली होती. या परिसरात आलेले सतचितानंद सोमेश्वर ब्रम्हचारी महाराज यांनी त्यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येते.मंदिरामध्ये काळ्या पाषाणात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती विराजमान आहे तर माता सीता व बंधू लक्ष्मणाची पांढऱ्या पाषाणातील आकर्षक मूर्ती विराजमान आहे.

मंदिरामध्ये महादेवाची पिंड व माता पार्वती व नंदीची पांढऱ्या पाषाणात मूर्ती आहे तर मंदिराची स्थापना करणाऱ्या ब्रम्हचारी महाराजांची पांढऱ्या पाषाणातील मूर्तीची नव्याने स्थापना करण्यात आली. मंदिराचा गाभारा व समोरील नगारखाण्याचे बांधकाम हे जुन्या पध्दतीचे चुना व विटामध्ये असून, उर्वरित मंदिराचे जीर्णोध्दार पंधरा वर्षांपूर्वी करण्यात आले आहे.

संस्थांचे नोंदणीकृत संचालक मंडळ असून, ते संस्थांचा कारभार पाहतात. श्रीराम जन्मोत्सव, अन्नकुट व ब्रम्हचारी महाराजांचा वर्धापन दिवस साजरा केला जातो. यावेळेस मंदिरातून ब्रह्मचारी महाराज यांच्या पालखीची नगरपरिक्रमा करण्यात येते.

मंदिराची स्थापना होऊन जवळजवळ सव्वादोनशे वर्षे झाली आहेत. रामनवमीला नऊ दिवशीय रामायण कथेचा कार्यक्रम मंदिरात घेतल्या जातो. याव्यतिरिक्त श्रीकृष्ण जन्माष्टमी, अन्नकुट, व मंदिराचा स्थापना दिवस साजरा करण्यात येतो.

- ताराचंद शर्मा, अध्यक्ष, श्रीराम संस्थान खेलदेशपांडे

श्री सोमेश्वर सतचितानंद ब्रम्हचारी महाराज यांनी सन १८०२ मध्ये मंदिराची स्थापना केली. मंदिरात विराजित श्रीरामचंद्राची, सीता मातेची व बंधू लक्ष्मणाची मूर्ती ही जयपूर राजस्थान येथून आणण्यात आली. मंदिराची स्वतंत्र विश्वस्थ नोंदणीकृत संचालक मंडळ असून, त्यांच्याद्वारे संस्थानचा कारभार चालविला जातो.

- घनश्याम सराफ, संचालक, श्रीराम संस्थान खेलदेशपांडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com