कर्जमाफीसाठी २५ हजार शेतकरी प्रतीक्षेत, आधार प्रमाणीकरणामुळे अडले होते कर्जमुक्तीचे घोडे 

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 19 June 2020

महात्मा जोतीराव फुले पीक कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण प्रक्रिया न झालेले २५ हजार ६०५ शेतकऱ्यांना खरीप हंगाम सुरू झाला तरी कर्जमुक्ती लाभ मिळू शकला नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर अडलेले कर्जमुक्तीचे घोडे आता पुन्हा धावू लागले असून, सेवा सहकारी संस्थेचे गटसचिव यांचेकडे व सेतू केंद्रांवर गुरुवारपासून (ता.१८) आधार प्रमाणीकरणाला सुरुवात झाली आहे.

अकोला ः महात्मा जोतीराव फुले पीक कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण प्रक्रिया न झालेले २५ हजार ६०५ शेतकऱ्यांना खरीप हंगाम सुरू झाला तरी कर्जमुक्ती लाभ मिळू शकला नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर अडलेले कर्जमुक्तीचे घोडे आता पुन्हा धावू लागले असून, सेवा सहकारी संस्थेचे गटसचिव यांचेकडे व सेतू केंद्रांवर गुरुवारपासून (ता.१८) आधार प्रमाणीकरणाला सुरुवात झाली आहे.

अकोला जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरण बाकी असलेल्या सुमारे २५ हजार ५०५ शेतकरींना कर्जमाफीचा लाभ मिळू शकला नाही. परिणामी त्यांना खरीप हंगाम सुरू होऊनही नवीन पीक कर्ज घेता आले नाही. मार्चपासून कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे आधार प्रमाणीकरणाचे काम थांबविण्यात आले होते. याबाबत शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्यानंतर सहकार विभागाने कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व सामाजिक अंतर पाळून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधिक (सहकार) डॉ.प्रवीण लोखंडे यांनी दिली.

कर्जमुक्तीवर नजर
- बँकांकडे नोंदणी ः १, ०९६३०
- पात्र शेतकरी ः १,००३६६
- आधार प्रमाणीकरण ः ७४,६१९
- प्रमाणीकरणाच्या प्रतीक्षेत ः २५६०५
- कर्ममुक्तीचा लाभ मिळाला ः ७०,७९८
- कर्जमाफीची रक्क ः ४४६.०८ कोटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25,000 farmers are waiting for debt waiver, debt relief horses were hampered due to Aadhaar certification akola marathi news