2nd Phase Lok Sabha Polling : चुरशीच्या लढतीत दोन मतदारसंघांसाठी ९ लाख ७९ हजार मतदार निवडणार खासदार

यवतमाळ-वाशीम व अकोला लोकसभा मतदारसंघांची मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार असून यासाठी दोन मतदारसंघांसाठी ९ लाख ७९ हजार २३६ मतदार दोन खासदार निवडणार आहेत.
2nd phase of lok sabha poll yavatmal washim akola voting day today
2nd phase of lok sabha poll yavatmal washim akola voting day today Sakal

वाशीम : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर यवतमाळ-वाशीम व अकोला लोकसभा मतदारसंघांची मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार असून यासाठी दोन मतदारसंघांसाठी ९ लाख ७९ हजार २३६ मतदार दोन खासदार निवडणार आहेत. दोन्ही मतदारसंघात काट्याची लढत आहे.

जिल्ह्यात एकूण ९ लाख ७९ हजार २३६ मतदार आहेत. त्यापैकी ५ लाख १० हजार ८१४ पुरुष, ४ लाख ६८ हजार ४०७ महिला तर १६ तृतीयपंथीयांचा समावेश आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. तसेच वाशीम, कारंजा विधानसभा मतदारसंघ हे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात.

जिल्ह्यात एकूण १ हजार ७६ मतदान केंद्र असून त्यात महिला ३ दिव्यांग ३, युवा ३ आणि ६३ आदर्श मतदान केंद्रांचाही समावेश आहे. या तिन्ही मतदार संघातील निवडणूक प्रक्रियेत ७ हजार ७१९ अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत. रिसोड मतदारसंघात तीन लाख १५ हजार ९२९ मतदार आहेत.

तसेच दिव्यांग मतदार २ हजार ८६३ तर ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले मतदार ३ हजार ९३२ आहेत. रिसोड विधानसभा मतदार संघात एकूण ३३७ मतदान केंद्र वाशीम विधानसभा मतदारसंघात ३८६ मतदान केंद्र असून ३ लाख ५६ हजार ५७२ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. कारंजा विधानसभा मतदारसंघात ३ लाख ६ हजार ७३६ मतदार आज मतदान करणार आहेत.

दोनही मतदारसंघात चुरस

आज होणाऱ्या निवडणुकीत अकोला व यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होत आहे. यवतमाळ-वाशीम मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना होत आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात वाशीम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहे. या मतदारसंघात भाजप, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने मतदारसंघ पिंजून काढल्याने या मतदारसंघातील कौल अकोला लोकसभेचा खासदार ठरविणार, अशी चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com