पातूर (अकोला) - तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपळडोळी (पेडका) येथील रहिवासी देवकाबाई भगवान अलाट (वय ५५) यांच्या गोठ्याला आग लागल्याने ४० शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ता. १८ फेब्रुवारी रोजी घडली असून, घटनेत तीन लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.