
कारंजा : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने आधार कार्डप्रमाणेच विद्यार्थ्यांची स्वतंत्र शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरुपात साठविण्याच्या उद्देशाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रत्येक विद्यार्थ्यांचा ''अपार'' अर्थात ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक रजिस्ट्री नंबर तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.