esakal | ५०० नवे पॉझिटिव्ह; ७५२ जणांना डिस्चार्ज

बोलून बातमी शोधा

५०० नवे पॉझिटिव्ह; ७५२ जणांना डिस्चार्ज
५०० नवे पॉझिटिव्ह; ७५२ जणांना डिस्चार्ज
sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला ः कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड रोगाने ग्रस्त १० जणांना मंगळवारी (ता. २७) बळी गेला. त्यासोबचत रॅपिड व आरटीपीसीआरच्या चाचणीत ५०० नवे रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त ७५२ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ५ हजार ३५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. २७) एक हजार ६१७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १ हजार २८३ अहवाल निगेटिव्ह तर ३३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरिक्त ७५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर १० जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आरटीपीसीआरच्या चाचणीत मंगळवारी दिवसभरात ३३४ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १३४ महिला व २०० पुरुषांचा समावेश आहे. मूर्तिजापूरमध्ये ३२, अकोट-५४, बाळापूर-२१, तेल्हारा-०३ , बार्शीटाकळी-सहा, पातूर-चार, अकोला ग्रामीणमध्ये २५ तर मनपा क्षेत्रात १८९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण कोरोना बाधितांची संख्या ३८ हजार ५४३ झाली आहे.

असे आहेत मृतक

- पहिला मृत्यू पारस येथील ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते.

- दुसरा मृत्यू विझोरा ता. बार्शीटाकळी येथील ४० वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते.

- तिसरा मृत्यू गिरी नगर येथील ५८ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते.

- चौथा मृत्यू मलकापूर येथील ६७ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते.

- पाचवा मृत्यू बाळापूर येथील ४४ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते.

- सहावा मृत्यू वाशिम बायपास येथील ४५ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते.

- सातवा मृत्यू अकोट फैल येथील ६१ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते.

- आठवा मृत्यू व्याळा ता. बाळापूर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते.

- नऊवा मृत्यू हनुमान बस्ती येथील ६३ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते.

- दहावा मृत्यू एकाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. सदर रुग्ण पातूर येथील ४० वर्षीय पुरुष होते. त्यांना दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते.

कोरोनाची सद्यस्थिती

- एकूण पॉझिटिव्ह - ३८५४३

- मृत - ६५५

- डिस्चार्ज - ३२५३५

- ॲक्टिव्ह रुग्ण - ५३५३

संपादन - विवेक मेतकर