शेतकऱ्यांचे ५८ कोटी ३२ लाखांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

58 crore 32 lakh loss to farmers

शेतकऱ्यांचे ५८ कोटी ३२ लाखांचे नुकसान

अकोला - जिल्ह्यात गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ७७ हजार ७४७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, शेतकऱ्यांचे ५८ कोटी ३२ लाख २४ हजार ३३६ रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाकडे शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. बाळापूर व अकोला तालुक्यात पावसामुळे शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. नदी, नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने काही भागातील शेती खरडून गेली. त्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे या नुकसानामुळे कंबरडेच मोडले. जिल्ह्यात २१ जुलैपर्यंत ३५५.१ मि.मी. (५१.६ टक्के) पावसाची नोंद झाली. याच दरम्यान अतिवृष्टी, वीज, वादळामुळे जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाला. त्यासोतबच जिल्ह्यातील २२२ घरांचे अंशत: तर दोन घराचे पूर्णत: नुकसान झाले. संबंधीत नुकसानीचे तालुकास्तरावर पंचनामे व मूल्यांकनाची कार्यवाही गत काही दिवसांपासून सुरू होती. वीज व अतिवृष्टीचा जनावरांनाही फटका बसला. त्यामुळी जिल्ह्यातील ११ जनावरांचा मृत्यू झाला.

शेती पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, भाजीपाला या पिकांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला. दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपिके व खरडून गेलेल्या शेत जमिनीचे पंचनामे करण्याची कारवाई ग्राम विकास, महसूल व कृषी विभागामार्फत करण्यात आली. त्यानुसार ७७ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला असून शेतकऱ्यांचे ५८ कोटी ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

असा बसला क्षेत्रनिहाय फटका

  • काेरडवाहू ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ५१४ गावे बाधित झाली आहेत, तर ७५ हजार ८३८ हेक्टर क्षेत्रावरील काेरवाहू पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५१ काेटी ५७ लाख ३ हजार ६३६ लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

  • बागायती ः जिल्ह्यातील बागायती क्षेत्रातील १०१ हेक्टर जमिनीवरील पिकांची हानी झाली असून, १२४ गावातील पिके बाधित झाली. यासाठी किमान १३ लाख ६६ हजार २०० रुपयांच्या निधीची गरज भासणार आहे.

  • फळ ः जिल्ह्यातील ८२.७५ हेक्टर क्षेत्रातील फळांची हानी झाली असून, यासाठी १४ लाख ८९ हजार ५०० रुपयांच्या निधीची गरज आहे.

१ हजार ७०० हेक्टर जमीन गेली खरडून

अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे १ हजार ७२४ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. ही जमिन ३५ गावातील आहे. त्यामुळे ४ हजार ५६६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यासाठी किमान ६ काेटी ४६ लाख ६५ हजारांचा निधी अपेक्षित आहे.

Web Title: 58 Crore 32 Lakh Loss To Farmers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..