
अकोला : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील प्रवेशासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेत संथगती दिसून येत आहे. आरटीईअंतर्गत १९१ शाळांमध्ये एकूण १९९२ जागा राखीव असून, आतापर्यंत १२६३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र, अद्यापही ७२९ जागा रिक्त असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या पोर्टलवर देण्यात आली आहे.