जबरी चोरीच्या घटना
जबरी चोरीच्या घटनाesakal

दुचाकी अडवून आठ हजार पळविले! अज्ञात पाच चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा

Published on
Summary

पोलिसांनी अज्ञात पाच चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला.

देऊळगाव राजा (बुलढाणा): दुचाकी अडवून शस्त्राने हल्ला चढवून तिघांना जखमी केले. खिशातून मोबाईलसह रोख आठ हजार रुपये जबरीने चोरून नेल्याची घटना शनिवारी रात्री जाफराबाद मार्गावरील पिंपळगाव चिलमखा प्रवासी थांबा नजीक घडली. पोलिसांनी अज्ञात पाच चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला.

जबरी चोरीच्या घटना
भीक मागण्यासाठी चिमुकल्यांची विक्री; ‘ती’ बालके देऊळगाव महीतील

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, जाफराबाद तालुक्यातील नांदखेडा येथील किशोर अंबादास खरात (वय 24) हे आपल्या दुचाकीने वडील आणि मामा सह घराकडे जात असताना पिंपळगाव चिलम खा बस थांब्याजवळ दोन दुचाकी वर आलेल्या पाच जणांनी दुचाकी आडवी लावून तिघांवर शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीला डोळ्याच्या बाजूला मारून जखमी केले. फिर्यादीच्या खिशातून एक मोबाईल व आठ हजार रुपये रोख जबरीने काढून घेतले.

जबरी चोरीच्या घटना
नगरला कोरोनाचा वेढा, गुंडेगाव, राळेगण, देऊळगाव लॉकडाउन

फिर्यादीच्या वडीलास पाठीवर विळ्याने मारून जखमी केले तर फिर्यादीचे मामा राहुल गरुड यांना डाव्या हातावर व डोक्यावर रुमालात गुंडाळून असलेल्या वस्तूने मारून जखमी केले. दोन दुचाकीवर आलेल्या पाच अनोळखी व्यक्ती लाल रंगाची पल्सर क्रमांक 8338 व दुसऱ्या एका मोटरसायकलवर बसून आले होते. त्या पाच आरोपींपैकी एक कापश्या नावाचा व्यक्ती होता, जखमी यांचे मेडिकल रिपोर्ट व किशोर अंबादास खरात राहणार नांदखेडा तालुका जाफराबाद यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात पाच व्यक्तींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला सदर प्रकरणात ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक डिएम वाघमारे तपास करीत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com