Khamgaon Accident : खामगाव-अकोला महामार्गावर भीषण अपघात; एक ठार, दोघे गंभीर जखमी
Road Accident : खामगाव–अकोला महामार्गावर मध्यरात्री भरधाव कारने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने शेख समीर जागीच ठार झाला, तर राजू खान व नाफेखान गंभीर जखमी. भीषण अपघातात कार चुराडली गेली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
खामगाव : खामगाव-अकोला महामार्गांवर २० जानेवारीचे मध्यरात्री १२.३० वाजता भरधाव कारचा भीषण अपघात होऊन एक युवक जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.