esakal | अबब...२० लाखांचा बोकड,आठवडी बाजारात बघ्यांनी केली गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

अबब...२० लाखांचा बोकड,आठवडी बाजारात बघ्यांनी केली गर्दी

अबब...२० लाखांचा बोकड,आठवडी बाजारात बघ्यांनी केली गर्दी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रिसोड (जि.वाशिम) ः रिसोडच्या आठवडी बाजारात गुरुवारी (ता.८) २० लाखाचा बोकड विक्रीस आला. एक नव्हे तर हे दोन बोकड होते. एकूण दोन बोकडाची किंमत ४० लाख रुपये ठेवण्यात आली. पाहणाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. (A goat worth Rs 20 lakh, crowded in the weekly market)

हेही वाचा: कोरोनाने केले 10 बालकांना अनाथ, बुलडाणा जिल्ह्यात बांधीत वाढले


मुस्लिम धर्माचे पवित्र उद उल अजहा (बकरी ईद) जवळ येऊन ठेपली आहे. या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या वतीने बोकडांची खरेदी करून त्याचा त्याग देण्याची प्रथा आहे. यासाठी व्यापाऱ्यांसह शेतकरीवर्ग सुद्धा या दिवसासाठी बोकडांना तयार करून ठेवत असतात. कारण बकरी ईदच्या निमित्ताने बोकडांना चांगली मागणी होते व चांगले भाव सुद्धा भेटत असतात. बुलढाणा जिल्ह्यातील मंगरूळ नवघरे येथील अनिस खान यांनी त्यांची दोन बोकडे रिसोड बाजारात विक्रीस आणले होते. बोकड पाहून खरेदीदारांची सुद्धा इच्छा झाली. एवढेच नव्हे तर या ठिकाणी बघ्यांची गर्दी सुद्धा चांगली झाली.

हेही वाचा: दर्शन घेऊन परतणाऱ्या चार युवकांवर काळाची झडप

या मागील कारण असे की, या दोन्ही बोकडांमधील एका बोकडावर अल्लाह तर, दुसऱ्या बोकडावर मोहम्मद असे प्राकृतिक नाव उमटलेले होते. मात्र, ग्राहकांनी जेव्हा याची किंमत विचारली तर, त्या वेळीच आश्चर्य व्यक्त करण्यात आले. खान यांनी एका बोकडाची किंमत २० तर दोन्ही बोकडाची किंमत ४० लाख सांगितले. काही ग्राहकांनी एका बोकडाची किंमत दीड तर कोणी पावणेदोन लाख देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, खान यांनी यास नकार देत आपल्या गावाकडे निघाले. मात्र, तरीही त्यांनी योग्य किंमत भेटल्यास याची विक्री करू असेही सांगितले. यापूर्वी खान यांनी या बोकडांना घेऊन बुलढाणा गाठले होते.

संपादन - विवेक मेतकर

(A goat worth Rs 20 lakh, crowded in the weekly market)

loading image