ACB arrests operator in akola bribery case : अकोल्यात वीज मीटर परत लावण्यासाठी २७ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या ऑपरेटरला अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी वायरमन अद्याप फरार आहे.
अकोला : वीज बिल थकीत असल्यामुळे घरातील वीज मीटर काढून नेल्यावर तक्रारदाराने वीज मीटर बसवून देण्याची मागणी केली असता, महावितरणच्या एमआयडीसी सबस्टेशनमधील ऑपरेटर संदीप वानखडे (४४) आणि वायरमन सतशील बोदडे यांनी २७ हजार रुपयांची लाच मागितली.