Road Accident : रखडलेला रस्ता अजून किती घेणार बळी? रिसोड मालेगाव रस्त्यावर दुचाकी घसरून एकाचा मृत्यू
Accident News : रिसोड-मालेगाव रस्त्याच्या लिंगा फाट्यावर तीन वर्षांपासून रखडलेले रस्त्याचे काम आणि मुरूम व गिट्टीने होणाऱ्या अपघातांमुळे एक जण मृत्यूमुखी पडला. नागरिकांनी रखडलेला रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
रिसोड : रिसोड - मालेगाव रस्त्याचे लिंगा फाट्याजवळ मागील तीन वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची मालिका सुरूच असून रखडलेला रस्ता आणखी किती बळी घेणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.