
बनावट दारू कारखान्यावर कारवाई
अकोला - पातूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बेलुरा खुर्द येथील बनावट दारू तयार करणाऱ्या कारखाण्यावर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकली. यात चार आरोपीला अटक करण्यात आली असून, लाखोंचा मुद्देमाल व बनावट दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.
बेलुरा खुर्द येथे बनावट देशीदारू तयार करून विक्रीचा व्यवसाय सुरू होता. या बाबत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर कारखाण्यावर विशेष पथकाने बेलोरा खुर्द गावात छापा टाकला. तेथे बनावट देशीदारू तयार करण्यासाठी लागणार कच्चा माल आढळून आला. याशिवाय बनावट दारूच्या आठ पेट्याही जप्त करण्यात आल्यात. खाली देशीदारूच्या बाटल्यांसह एकूण एक लाखांवर मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत आरोपी अमोल दाबेराव, बजरंग किसन दाबेराव, दिनेश देवलाल दाबेराव, राहुल सुभाष बरगे (सर्व रा. बेलोरा खुर्द) या चार आरोपीला अटक करण्यात आली.
Web Title: Action On Fake Liquor Factory At Belura Khurd Patur Taluk Akola
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..