esakal | भाजपच्या आंदोलनाविरुद्ध ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रती आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

vanchit

भाजपवाल्यांच्या नाटकी आंदोलनास शेतकऱ्यांनी बळी पडू नये, यासाठी सोमवारी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याचे वतीने शेताच्या बांधावर कर्जमुक्ती आंदोलन व ‘भाजपा से किसान बचाव’ अभियान राबविण्यात आले.

भाजपच्या आंदोलनाविरुद्ध ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रती आंदोलन

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व कर्जवाटप महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब करावे. कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी आणि भाजपवाल्यांच्या नाटकी आंदोलनास शेतकऱ्यांनी बळी पडू नये, यासाठी सोमवारी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याचे वतीने शेताच्या बांधावर कर्जमुक्ती आंदोलन व ‘भाजपा से किसान बचाव’ अभियान राबविण्यात आले.


मागील दोन वर्षांत ज्या शेतकरी लोकांनी पीक कर्ज गठन केले. परंतु त्या शेतकऱ्यांना शासनाने पीक कर्ज माफीमध्ये बसविले नाही. त्यांना तत्काळ कर्ज माफीत पात्र ठरविण्यात यावे. दोन लाखांच्या वर ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे, त्यांना सुध्दा कर्ज माफी मिळाली पाहिजे. ज्या शेतकरी बांधवांना कर्ज माफी झाली पण त्यांच्या खात्यात अद्यापपर्यंत शासनाने पैसे जमा केले नाहीत म्हणून ते शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत त्यांना सुध्दा त्वरीत लाभ व्हावा. राज्यात कोरोनाचे संकट आहे. परंतु त्याचा सर्वाधिक फटका शेतकरी-शेतमजूर यांना बसत आहे. केंद्र सरकारची थेट आर्थिक मदत ही बनवाबनवी होती. तशीच राज्य सरकारच्या कर्जमाफी व पीक कर्ज तसेच ‘बांधावर खत आणि बियाणे’ या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. पीककर्जाचे वाटप ठप्प झाले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हाचे वतीने सोमवारी अभिनव आंदोलन करण्यात आले. शेतकरी विरोधी भाजपाचे आंदोलन नाटकी असून, त्यास शेतकऱ्यांनी बळी पडू नये असे आवाहन ‘वंचित’चे राज्य प्रवक्ता राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, वंचित जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिप जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे यांनी केले आहे.


सत्ता असताना शाहणपण सूचले नाही
राज्य सरकारने प्रसंगी स्वतः कर्ज उभारणी करावी पण शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावी व कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करावी, अशी भाजपची मागणी आहे. परंतु त्यांच्या सरकारच्या काळात हे शहाणपण त्यांनी का दाखविले नाही, असा सवाल ‘वंचित’ने विचारला आहे. शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या गोळा करून त्यांचे निवेदन भाजपतर्फे राज्य सरकारला सादर करणार आहे. हा निव्वळ स्टंट असून, शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला केंद्रातील भाजप व राज्यातील आघाडी सरकार सारखेच जबाबदार आहे, असा आरोपही ‘वंचित’तर्फे करण्यात आला.