
अकोला ः जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून रुग्णांना खाटा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सीजनच्या अतिरिक्त ३१३ खाटा उपलब्ध करुन देण्या आल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनामार्फत पालकमंत्र्यांच्या सूचनेवर सदर खाटांचे वाढीव नियोजन करण्यात आले आहे. Additional 313 oxygen beds available for corona sufferers in Akola
कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना आढावा बैठकीत पालकमंत्री बच्चू कडू यांनी ग्रामीण रुग्णालयात आवश्यक सोईसुविधा, वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग स्टाफ उपलब्ध करुन त्या-त्या भागातील रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात उपचार सुविधा निर्माण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी, बाळापूर येथे प्रत्येकी २०-२०, मूर्तिजापूर येथे ४८, जिल्हा स्त्री रुग्णालय येथे ५०, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे ३५, तर पंजाबराव देशमुख विद्यापीठ येथील जॅम्बो हॉस्पीटल येथे १०० असे एकूण ३१३ ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. तर नॉन-ऑक्सिजन बेड तयार करण्याचे कार्यादेश दिले असून या सुविधाही येत्या १५ दिवसांत कोरोना रुग्णांच्या उपचाराकरिता उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली आहे.
नॉन-ऑक्सिजन बेडची सुविधा लवकरच
कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी व बाळापूर येथे प्रत्येकी १०, तर मूर्तिजापूर येथे ५०, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे १५ असे एकूण १०५ नॉन ऑक्सीजन बेड उपलब्ध होणार आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे ५० व खेडकर महिला वसतीगृह तेल्हारा येथे ५० बेडची व्यवस्था प्रस्तावित असून सदर व्यवस्था येत्या १५ दिवसांत पूर्ण होईल.
संपादन - विवेक मेतकर
Additional 313 oxygen beds available for corona sufferers in Akola
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.