
अकोला ः जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या उपाचारासाठी व्हेंटिलेटरची आवश्यकता बघता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मूर्तिजापूर ग्रामीण रुग्णालयासाठी पाच व्हेंटिलेटर सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे सोपविले. आमदार नितीन देशमुख, उप जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या उपस्थित जिल्हाधिकाऱ्यांकडे ते सोपविण्यात आले. (Aditya Thackeray donated five ventilators for the treatment of Corona patients)
कोरोना रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची गरज मोठ्याप्रमाणावर भासत आहे. सध्या असलेली यंत्रणा अपुरी पडत आहे. गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयातील उपचार परवडणारा नाही. त्यामुळे अनेक रुग्णांचे नातेवाई व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची सुविधा करून देण्याची मागणी करीत लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतात. ही परिस्थिती बघून रुग्णांना आवश्यकतेनुसार उपाचार मिळावे या उद्देशाने अकोला जिल्ह्यातील स्थितीबाबत शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना माहिती दिली.
त्यानी तातडीने अकोला जिल्ह्यासाठी पाच व्हेंटिलेटर पाठविले. हे व्हेंटिलेटर सोमवारी आमदार देशमुख, निवासी उप जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व शिवसैनिकांच्या उपस्थितीत अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्याकडे सोपविण्यात आले.
रुग्णांना त्यांच्या तालुक्यात उपाचार मिळावे, कुणीही उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. आज उपलब्ध झालेले व्हेंटिलेटर गरजेनुसार रुग्णांच्या सेवेत उपलब्ध करून दिले जातील.
- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, अकोला.
संपादन - विवेक मेतकर
Aditya Thackeray donated five ventilators for the treatment of Corona patients
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.