
रक्षाबंधनच्या एक दिवस आधी अकोल्यात रविवारी आज पूर्ण लॉकडाउन जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला होता. सदर लॉक डाउन अमान्य करीत आज वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निवासस्थानी गेट समोर राखीचे दुकान लावून जिल्हा प्रशासनाने लावलेल्या लॉकडाउन अमान्य केला
अकोला : रक्षाबंधनच्या एक दिवस आधी अकोल्यात रविवारी आज पूर्ण लॉकडाउन जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला होता. सदर लॉक डाउन अमान्य करीत आज वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निवासस्थानी गेट समोर राखीचे दुकान लावून जिल्हा प्रशासनाने लावलेल्या लॉकडाउन अमान्य केला.
व्यापारी, छोटे व्यावसायिक यांना महापालिका व पोलीस दादागिरी करीत दुकाने बंद करायला भाग पाडत असल्याचं तसेच दंड लावत असल्याचे समजले असता प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, गौतम गवई, कलिम खान, राजेश तायडे, सचिन शिराळे, उमेश गोपणारायण, अतुल तेलमोरे, समीर भोजने, मुन्ना तायडे, अनवर शेरा, आकाश गवई, यांनी अभिनव आंदोलन केले.
संपादन - सुस्मिता वडतिले